बॉलिवूड क्वीन कंगना रणौत निवडणूकीत उतरणार असल्याची चर्चा सध्या सतत रंगत आहे. पण यावर आता अभिनेत्रीने मौन सोडले असून तिचे मत व्यक्त केले आहे.
चंदीगढमध्ये अभिनेत्री किरण खेर खासदार म्हणून काम पाहत आहेत. पण त्या सर्वसामान्यांच्या समस्या जाणण्यासाठी कधीच मैदानात उतरल्या नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला होता त्यामुळे किरण खेर यांच्या जागी नवीन चेहरा उतरवण्याचा विचार भाजप करत असल्याचे बोलले जाते. शिवाय कंगना भाजपच्या प्रत्येक निर्णयाचे समर्थन करत असते. त्यामुळे भाजपाकडून कंगनाला चंदीगढ मध्ये उमेरदवारी मिळू शकते असे काहींचे म्हणणे आहे.
अभिनेत्रीने यावर प्रतिक्रिया देत हे वृत्त फेटाळून लावले आहे. कंगनाने इन्स्टा स्टोरीवर लिहिले आहे की, ‘मी हेडलाइन दिली आहे असे समजून माझे नातेवाईक आणि मित्र मला ती पाठवत आहेत, पण ही हेडलाइन आणि बातमी माझ्याकडून देण्यात आलेली नाही.’
आम आदमी पार्टीही पुढच्या लोकसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाचे नेते आणि पंजाबचे राज्यसभा खासदार राघव चढ्ढा यांची पत्नी बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा हिला आपला नवा उमेदवार बनवू शकते अशी चर्चा रंगली आहे. मात्र, याबाबत अद्याप कोणतीही ठोस माहिती समोर आलेली नाही.
एक के बाद एक कई हिट गाने देनेवाले और अपने गानों से लोगों के दिलों…
जग आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करत असताना, आगामी मराठी चित्रपट महिलांची ताकद, लवचिकता आणि समानतेसाठीच्या…
टीम इंडिया (Team India) द्वारा चैम्पियंस ट्रॉफी (Champions Trophy) जीतने के बाद क्रिकेटर के एल…
महाराष्ट्रातील प्रत्येक प्रांतात एक बोली भाषा बोलली जाते. महाराष्ट्राच्या विदर्भात बोलली जाणारी वऱ्हाडी ही मराठीची अत्यंत महत्त्वाची…
आईआईफा 2025 में करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) ने अपने दिवंगत दादाजी और शोमैन…
मैं तो सच में मदहोश हो गई. गाने के हर लफ़्ज़ के साथ जैसे एक…