Uncategorized

झरीन खान रुग्ण्यालयात भरती ? अभिनेत्रीनेच शेअर केला फोटो (Zareen Khan Hospitalised , Actress Shares Health Update From Hospital)

बॉलिवूड अभिनेत्री झरीन खानला डेंग्यू झाला असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून चाहत्यांना तिच्या आरोग्याविषयी अपडेट दिले आहे. मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे, त्यामुळे अभिनेत्रीने लोकांना डेंग्यूपासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचा सल्ला दिला आहे.

अभिनेत्री झरीन खानला डेंग्यूमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डेंग्यूमुळे तिला खूप ताप आला होता आणि बॉडी पॅन झाली होती, पण आता अभिनेत्रीची प्रकृती हळूहळू सुधारत आहे. स्वत: झरीन खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून याची माहिती दिली.

झरीन खानने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तिच्या हातात सलाइल लावलेले दिसत आहे. काही वेळाने अभिनेत्रीने ती स्टोरी काढून टाकली.

त्यानंतर काही वेळाने अभिनेत्रीने तिच्या इन्स्टा स्टोरीमध्ये आणखी एक फोटो पोस्ट केला. दुसऱ्या स्टोरीत ज्युसचा ग्लास दिसतो. हा फोटो शेअर करताना झरीन खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- रिकव्हरी मोड.

मुंबईत डेंग्यूचे रुग्ण झपाट्याने पसरत आहेत. म्हणूनच अभिनेत्रीने लोकांना डेंग्यू टाळण्याचे आवाहन केले आहे, तसेच डेंग्यूपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. आपल्या सभोवतालचे वातावरण स्वच्छ ठेवा आणि डासमुक्त वातावरण राखण्यास सांगितले.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025
© Merisaheli