Close

डॉन ३ मध्ये शाहरुखच्या जागी रणवीर सिंहची वर्णी, फरहान अख्तरने शेअर केला चित्रपटाचे अनाउंसमेंट टिझर (Ranveer Singh Replaces Shah Rukh Khan, Farhan Akhtar shareTeaser to Reveal First Look)

चित्रपट निर्माता फरहान अख्तरने अखेर त्याच्या आगामी चित्रपट डॉन 3 बद्दल खुलासा केला आहे. त्याच्या चित्रपट डॉन 3 मध्ये शाहरुख खानऐवजी रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत दिसणार आहे. यापूर्वी फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन-२ मध्ये शाहरुख खान डॉन झाला होता. पण फ्रँचायझीच्या तिसऱ्या भागात रणवीर सिंग डॉनच्या रुपात नवा डॉन बनणार आहे.

चित्रपट निर्माता फरहान अख्तरने त्याच्या डॉन 3 चित्रपटाचा फर्स्ट लूक रिलीज केला आहे आणि घोषणा केली आहे की त्याच्या डॉन 3 चित्रपटात शाहरुख खानची जागा  रणवीरने घेतली आहे. शेअर केलेल्या टीझरची सुरुवात रणवीरच्या डायलॉगने होते आणि शेवटी त्याचा चेहरा समोर येतो. व्हिडीओ शेअर करताना फरहान अख्तरने लिहिले - एक नवीन युग सुरू झाले आहे. डॉन 3.

शेअर केलेल्या टीझर व्हिडिओमध्ये रणवीर सिंग डॉनच्या भूमिकेत पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये, शहरातील सर्वात उंच इमारतीमधील स्कायलाइनसमोर एक अपार्टमेंट उघडते आणि पार्श्वभूमीत रणवीर सिंगचा आवाज ऐकू येतो  शेर जो सो रहा है, वो जागेगा कब? पूछते हैं ये सब, उनसे कह दो, फिर जाग उठा हूं मैं. और फिर सामने जल्द आने को. क्या है ताकत मेरी, क्या है हिम्मत मेरी. फिर दिखाने को. मौत से खेलना जिंदगी है मेरी. जीतना ही मेरा काम है. तुम तो हो जानते. जो मेरा बाप है। 11 मुल्कों की पुलिस ढूंढती है मुझे, मगर पकड़ पाया है कौन. मैं हूं डॉन.'

यादरम्यान, रणवीर स्टेटमेंट शेड्स घालतो, सिगारेट ओढतो आणि टिपिकल डॉन स्टाईलमध्ये रिव्हॉल्व्हर फायर करतो. एक्सेल एंटरटेनमेंटच्या रितेश सिधवानी आणि फरहान अख्तरचा हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/