Close

तैमूर नावावरुन झालेल्या वादावर करीनाने सोडले मौन, म्हणाली असे कोणत्याच आईच्या बाबतीत होऊ नये (Kareena Kapoor Khan Breake Silence On Elder Son Naming Taimur)

करीना कपूर खानने तिच्या नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत आपल्या  वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टींचा खुलासा केला. अभिनेत्रीने आपल्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यावरून झालेल्या वादावरही चर्चा केली.

करीना कपूर खान आणि सैफ अली खान त्यांच्या वैयक्तिक आयुष्याशी निगडीत अनेक गोष्टींमुळे सोशल मीडियावर हेडलाईन बनवत असतात, याआधी हे जोडपे प्रकाशझोतात आले जेव्हा त्यांच्या लहान मुलाचा जन्म झाला आणि त्यांनी लहानाचे नाव नवाब जहांगीर ठेवले.

इतकेच नाही तर लहान मुलाचे नाव जहांगीर म्हणजेच जेह ठेवण्यापूर्वी मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवल्याबद्दलही या जोडप्याला प्रचंड टीकेला सामोरे जावे लागले. आपल्या मोठ्या मुलाच्या जन्मानंतर इतक्या वर्षांनी अभिनेत्रीने या संपूर्ण वादावर आपले मौन तोडले आहे.

अलीकडेच इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत करीना कपूर खानने सांगितले की, तिच्या मोठ्या मुलाचे नाव तैमूर ठेवण्यामागे एक खास कारण आहे. सैफचा एक चांगला मित्र होता ज्याचे नाव तैमूर होते, तो त्याचा शेजारीही होता. दोघे एकत्र वाढले. सैफला त्याचा मित्र आणि त्याचे नाव खूप आवडायचे. सैफ अनेकदा म्हणायचा की, मला मुलगा झाला तर मी त्याचे नाव तैमूर ठेवीन, कारण माझा मुलगा माझा पहिला मित्र असेल.

मुलाखतीदरम्यान करिनाने असेही सांगितले की, तैमूर नावाचा इतर कोणाशीही संबंध नाही. जेव्हा मला कळले की माझ्या मुलाच्या नावामुळे लोक आमच्यावर कठोर टीका करत आहेत आणि आमच्याबद्दल वाईट बोलत आहेत, तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेले. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये बसून खूप रडत होते, आजही समजत नाही की आमच्यासोबत असं का झालं? आम्हाला कोणाच्याही भावना दुखावायच्या नव्हत्या. सरतेशेवटी, मला एवढेच सांगायचे आहे की असे कोणत्याही आईच्या आणि तिच्या मुलाच्या बाबतीत होऊ नये.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/