गणपती बाप्पाच्या आगमनासाठी आता अवघे काही दिवस उरले आहेत. भक्तीमय वातावरणाने भारावून टाकणारे हे १० दिवस वर्षभर पुरेल इतकी ऊर्जा आणि नवचैतन्य देऊन जातात. लाडक्या बाप्पाचा हा उत्सव जल्लोषात साजरा करण्यासाठी स्टार प्रवाहचा संपूर्ण परिवार सज्ज आहे. स्टार प्रवाह परिवार गणेशोत्सव २०२३ या गणपती विशेष कार्यक्रमाची यंदाची थीम आहे आरती घराघरातली.
ज्या आरत्या आपण मनोभावाने म्हणतो त्या आरत्या रचल्या कुणी आणि त्यामागची गोष्ट या कार्यक्रमातून दाखवण्यात येईल. सुप्रसिद्ध संगीतकार जोडी अविनाश-विश्वजीत यांनी या कार्यक्रमासाठी काही आरत्यांना नव्याने संगीतबद्ध केलं आहे. मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादचे स्पर्धक आणि प्रवाह परिवारातल्या कलाकारांनी मिळून बाप्पाच्या आरत्या नव्या अंदाजात सादर केल्या आहेत.
या गणपती विशेष कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी पार पाडलीय मन धागा धागा जोडते नवा मालिकेतील सार्थक आणि अबोलीने. गणरायाच्या या जल्लोषात निर्मिती सावंत आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्यातली धमाल जुगलबंदी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवणार आहेत. हा कार्यक्रम येत्या रविवारी २४ सप्टेंबरला स्टार प्रवाहवर सायंकाळी ७ वाजता प्रक्षेपित होईल.
ठरलं तर मग मालिकेतला अर्जुन म्हणजेच अभिनेता अमित भानुशालीचा कधीही न पाहिलेला अंदाज प्रेक्षकांसमोर येणार…
स्टार प्रवाहवरील घरोघरी मातीच्या चुली मालिकेत सध्या श्री आणि सौ स्पर्धेची रंगत दिवसेंदिवस वाढत आहे.…
सामान्य माणसांप्रमाणेच बॉलिवूड सेलिब्रिटी आणि परदेशी लोकही २०२५ च्या महाकुंभात पवित्र स्नान करत आहेत. अशा…
आगामी चित्रपट 'सिकंदर'च्या रिलीजपूर्वी, बॉलिवूडचा दबंग स्टार सलमान खान त्याचा पुतण्या अरहान खान म्हणजेच अरबाज…
बॉलीवुड को सुपर हिट सॉन्ग देने वाले म्यूजिक डायरेक्टर प्रीतम चक्रवर्ती (Music Director Pritam Chakarborty)…
We all want to be as fit as possible, yet we end up adopting certain…