Marathi

करिअरच्या सुरुवातीला आमिर खानला वाटायची या गोष्टीची भीती, पण तरीही केले इंडस्ट्रीवर राज्य (Aamir Khan had Become Insecure, He Was Afraid Early Stage of His Career)

बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारणाऱ्या कलाकारांना त्यांची उंची, शरीर, लूक, व्यक्तिमत्त्व आणि फिटनेसची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यासाठी ते लाखो रुपये पाण्यासारखे खर्च करायला मागेपुढे पाहत नाहीत, पण लाखो रुपये खर्च करूनही काही सेलिब्रिटी कोणत्या ना कोणत्या बाबतीत असुरक्षित वाटून घेतात. एकेकाळी आमिर खानही खूप इनसिक्योर झाला होता. करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्याला एका गोष्टीची भीती वाटू लागली होती. चला जाणून घेऊया बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला कशामुळे इनसिक्योर वाटू लागले होते.

2012 मध्ये ‘तलाश’ चित्रपटादरम्यान एका मुलाखतीत राणी मुखर्जीने तिच्या उंचीबद्दल सांगितले की ती जर उंचीने सर्वात लहान असेल तर ती आमिर खानच्या हृदयाच्या जवळ जाऊ शकते. राणीच्या या वक्तव्याने आमिर खान खूप प्रभावित झाला होता. अभिनेत्री म्हणाली होती की, एखाद्याची उंची ही ती व्यक्ती त्यांच्या आयुष्यात काय करते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व काय आहे यावर अवलंबून असते आणि आमिरचे व्यक्तिमत्त्व खूप मोठे आहे.

याच मुलाखतीत आमिर खान आणि राणी मुखर्जी यांना विचारण्यात आले की, करिअरमध्ये उंची किती महत्त्वाची आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना आमिरने सांगितले होते की, करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये तो त्याच्या उंचीबद्दल खूप चिंतेत होता. त्याला त्याच्या उंचीमुळे खूप इनसिक्योर वाटायचे.

अभिनेत्याच्या म्हणण्यानुसार, त्याच्या उंचीमुळे लोक त्याला टिंगू म्हणतील अशी भीती वाटत होती. सुरुवातीच्या काळात त्याला त्याच्या कमी उंचीची काळजी वाटत होती, पण कमी उंची असूनही तो सर्वांच्या पसंतीस उतरला होता. अभिनेत्याने सांगितले होते की त्या काळात अमिताभ बच्चन इंडस्ट्रीवर राज्य करत होते, अशा परिस्थितीत त्याला त्याच्या कमी उंचीची भीती वाटत होती.

मुलाखतीत आमिरने पुढे सांगितले होते की, इंडस्ट्रीत जेव्हा कोणी नवीन येतो तेव्हा त्याला अनेक गोष्टींची भीती वाटते. उंचीने लहान असूनही, त्याने इंडस्ट्रीत स्वतःसाठी एक स्थान निर्माण केले असले तरी , तो अजूनही अनेक गोष्टींबद्दल चिंतेत आहे.

आमिर खानच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो शेवटचा ‘लाल सिंह चढ्ढा’ या चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात आमिरसोबत करीना कपूर खान दिसली होती, मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही खास कमाल दाखवू शकला नाही. आमिर काही नवीन प्रोजेक्ट्सवर काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे, मात्र त्याबद्दल त्याने कोणताही खुलासा केलेला नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli