Close

ऐशोआरामाचे आयुष्य सोडून असे जीवन जगतोय आमिर खानचा भाचा इम्रान खान, ६ वर्षांपूर्वी सोडलेली इंडस्ट्री (Aamir Khan’s Nephew Imran Khan Adopts Simple Lifestyle… 3 Plates, 3 Forks, 2 Coffee Mugs And 1 Pan)

आमिर खानचा भाचा इम्रान खानने बॉलिवूडमध्ये दमदार प्रवेश केला होता. 2008 मध्ये रिलीज झालेला 'जाने तू या जाने ना' हा मुख्य अभिनेता म्हणून त्याचा पहिला चित्रपट होता. हा चित्रपट प्रचंड गाजला आणि इम्रानला वेगळी ओळख मिळाली. पण तो फक्त काही चित्रपटांमध्ये दिसला. इम्रान शेवटचा 2015 मध्ये रिलीज झालेल्या कट्टी बट्टी या चित्रपटात दिसला होता. यानंतर त्याने चित्रपटांपासून स्वताला दुरावले.

इम्रानने पुनरागमन करावे असे त्याच्या चाहत्यांना नेहमीच वाटत असले तरी, इम्रानचे जीवन आणि विचार खूप बदलले आहे. अलीकडेच व्होग इंडियाला दिलेल्या मुलाखतीत त्याने खुलासा केला की आता तो खूप साधे जीवन जगतो.

इम्रान म्हणाला की 2016 पासून त्याच्या करिअरचा आलेख खाली जात होता. तो अभिनयाबाबत उत्सुक नव्हता. दरम्यान, जेव्हा तो बाबा झाला तेव्हा त्याने अभिनेता होण्यापेक्षा चांगले वडील बनणे महत्त्वाचे मानले. आपल्या मुलीसाठी स्वतःला चांगले बनवण्यासाठी त्याने चित्रपट सोडले. इम्रानने सांगितले की, 2016 पासून तो स्वतःचे केसही स्वतःच कापत आहे. त्याने आपली महागडी फेरारी विकली आणि आता फोक्सवॅगन वापरतो. जोपर्यंत पैशांचा प्रश्न आहे, तोपर्यंत आपल्याला पैशाची चिंता नसल्याचे त्याने सांगितले.

पाली हिल येथील आलिशान बंगला सोडून आता तो वांद्रे येथील एका अपार्टमेंटमध्ये राहत असल्याचे अभिनेत्याने सांगितले. त्याच्या स्वयंपाकघरात फक्त तीन प्लेट्स, तीन फॉर्क , दोन कॉफी मग आणि एक फ्राइंग पॅन आहे.

गेल्या दहा वर्षांपासून तोच चष्मा आणि सूट पुन्हा वापरत असल्याचेही इम्रानने सांगितले. एक काळ असा होता की तो फोनला चिकटलेला असायचा पण आता त्याला त्याची गरज वाटत नाही. इमरान म्हणतो की, आता माझा विलासी जीवनाऐवजी साध्या जीवनावर विश्वास आहे. माझा दृष्टीकोन खूप बदलला आहे.

सोशल मीडियापासून अंतर राखणाऱ्या इम्रानने सोशल मीडियावर जबरदस्त कमबॅक केले. त्याने चित्रपटांमध्ये परत यावे, अशी चाहत्यांची इच्छा आहे. चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे, इम्रान लवकरच पुनरागमन करू शकतो. पत्नी अवंतिकापासून विभक्त झाल्यानंतर सध्या तो लेखा वॉशिंग्टनला डेट करत आहे. आयराच्या लग्नातही दोघे एकत्र दिसले होते.

Share this article