Uncategorized

लोकल ट्रेनने प्रवास करण्यासाठी आईने दिलेल्या सूचना आजही आठवतात – सोनाली बेंद्रेने दिला आठवणींना उजाळा (Actress Sonali Bendre Becomes Nostalgic About Mother’s Guidelines While Travelling In Mumbai Local Trains)

प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने मुंबई लोकलने केलेल्या प्रवासाबाबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. कॉलेजला असताना सोनाली ही लोकल ट्रेनने प्रवास करायची. सोनालीच्या आईने लोकलने प्रवास करतेवेळी काय काळजी घ्यायची याच्या काही सूचना तिला दिल्या होत्या. महिलांच्या डब्यातून प्रवास करणे, अंधार पडल्यानंतर एकटीने प्रवास करू नये अशा अनेक गोष्टी महिला, लोकल ट्रेनने प्रवास करताना ध्यानात ठेवत असतात.

लोकलने प्रवास करताना काय काळजी घ्यावी हे सगळ्या वयोगटातील महिलांना चांगले ठाऊक असते. सुरक्षित प्रवासासाठी आणखी काय करावे, याची माहिती देण्यासाठी एका विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. ‘खाकी मे सखी’ असे या उपक्रमाचे नाव असून सोनाली बेंद्रे हिने या उपक्रमाची ओळख करून दिली आहे. हा उपक्रम मुंबई रेल्वे पोलीस आणि ‘कोटो’ या सोशल कम्युनिटी प्लॅटफॉर्मने संयुक्तरित्या राबवण्याचे ठरवले आहे. खाकी वर्दीतील महिला पोलीस या आपल्या सखीप्रमाणे असून संकटसमयी, अडचणीच्या प्रसंगी आपण त्यांना मदतीसाठी हाक मारू शकतो ही संकल्पना रुजवण्याचा या उपक्रमामार्फत प्रयत्न केला जात आहे.

कोटो कम्युनिटी खाकी मे सखी’ हा एक ऑनलाईन मंच असून यावर महिला आपली मते, आपल्या चिंता, समस्या खुलेपणाने मांडू शकतात.  अवेळी प्रवास करताना वाटणारी भीती, लैंगिंक छळ, पुरुषांच्या डब्यातून प्रवास करताना इतरांमुळे वाटणारा संकोच यासारख्या समस्या महिला प्रवासी या मंचाद्वारे मांडू शकतात.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

बीमारियों से दिलाएंगी छुटकारा अदरक की ये इफेक्टिव होम रेमेडीज़ (11 Surprising Health Benefits Of Ginger)

यूं तो अदरक हमारे रोज़मर्रा के खानपान में शामिल ही रहता है, फिर वो सुबह…

April 16, 2024

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या ॲनिमेटेड ‘बुनी बियर्स’ चित्रपटाचे पोस्टर लॉंच! (The Poster Launch Of The Animated Movie ‘Bunny Bears’, Which Gives Courage And Stubbornness To Children!)

कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच…

April 16, 2024

‘कौन बनेगा करोडपती’च्या १६ व्या सीझनची घोषणा, अमिताभ बच्चनचा प्रोमो व्हायरल ( Kaun Banega Crorepati 16 Promo Registration Begins Amitabh Bachchan Announces It)

'कौन बनेगा करोडपती'च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमिताभ बच्चन लवकरच त्यांच्या शोच्या 16व्या सीझनसह…

April 16, 2024
© Merisaheli