Marathi

चित्रपटांसोबतच छोट्या पडद्यावर सूत्रसंचालन करुन भरमसाठ कमवतात हे कलाकार (Apart from Salman Khan and Amitabh Bachchan, These Bollywood Stars Earn Big Money by Hosting Reality Shows on TV)

एक काळ असा होता की मोठ्या पडद्यावरचे स्टार्स फक्त चित्रपटातच आपले अभिनय कौशल्य दाखवत असत, पण आता बदलत्या काळानुसार अनेक मोठे स्टार्स छोट्या पडद्यावरही आपली अभिनयाची चुणूक दाखवत आहेत. पूर्वी फक्त काही सेलिब्रिटी छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शो सूत्रसंचालित करत असत, परंतु गेल्या काही वर्षांपासून छोट्या पडद्यावर आपली उपस्थिती दर्शविणाऱ्या सेलिब्रिटींची संख्या वाढत आहे. बॉलिवूड स्टार्स चित्रपटांसाठी भरमसाठ फी आकारतात, परंतु हे सेलिब्रिटी छोट्या पडद्यावर रिअॅलिटी शो होस्ट करूनही मोठी कमाई करत आहेत. सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांच्याशिवाय रिअॅलिटी शोमधून प्रचंड कमाई करणाऱ्या इतर बॉलिवूड स्टार्सवर एक नजर टाकूया…

सलमान खान

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने आतापर्यंत ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचे १३ सीझन होस्ट केले आहेत आणि प्रत्येक सीझनसोबत त्याची फी वाढत आहे. रिपोर्ट्सनुसार, बिग बॉस सीझन 16 च्या एका एपिसोडसाठी सलमान खानला 10 ते 12 कोटी रुपये फी दिली जात होती.

अमिताभ बच्चन

मेगास्टार अमिताभ बच्चन गेल्या अनेक वर्षांपासून छोट्या पडद्यावर आहेत. बिग बींनी ‘कौन बनेगा करोडपती’चे आतापर्यंत 12 सीझन होस्ट केले आहेत. प्रत्येक सीझनसोबत बिग बींच्या फीमध्येही वाढ होत आहे. अमिताभ ‘कौन बनेगा करोडपती 13’ च्या एका एपिसोडसाठी 4-5 कोटी रुपये आकारतात.

कंगना राणौत

बॉलिवूडची कॉन्ट्रोव्हर्सी क्वीन कंगना राणौतही छोट्या पडद्यावर आपली मोहिनी पसरवत आहे. रिपोर्ट्सनुसार, कंगना ‘लॉकअप’च्या एका एपिसोडच्या होस्टिंगसाठी एक कोटी रुपये घेते. मोठ्या पडद्यासोबतच छोट्या पडद्यावरही कंगनाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे.

करण जोहर

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता करण जोहरने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बनवले आहेत, परंतु तो टीव्हीवर रिअॅलिटी शो होस्ट करण्यासाठी देखील ओळखला जातो. करण जोहर ‘कॉफी विथ करण’च्या एका एपिसोडसाठी 1 ते 2 कोटी रुपये घेतो.

रोहित शेट्टी

चित्रपट निर्माता रोहित शेट्टीने स्टंट-आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’ चे अनेक सीझन होस्ट केले आहेत. गेल्या सीझनमध्ये त्याने एका एपिसोडसाठी सुमारे 50 लाख फी घेतल्याचे सांगितले जात आहे.

सोनू सूद

गरिबांचा कैवारी आणि बॉलिवूड इंडस्ट्रीतील सर्वोत्कृष्ट अभिनेता सोनू सूदने अनेक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली आहे. मोठ्या पडद्यावर जादू पसरवल्यावर तआता सोनू सूदही छोट्या पडद्याकडे वळला आहे. सोनू सूद ‘MTV रोडीज’ होस्ट करत आहे, ज्यासाठी त्याला भरमसाठ फी दिली जात आहे. मात्र, शुल्काबाबत कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

इन बीमारियों में प्रेग्नेंसी हो सकती है रिस्की (Pregnancy Can Be Risky In These Diseases)

मां बनना हर नारी का सपना होता है. लेकिन क्या आप जानते हैं कि कुछ…

May 1, 2024

कहानी- मुझे चांद चाहिए (Short Story- Mujhe Chand Chahiye)

"दवाई क्यों देंगे रिया? डॉल को चोट लगी है क्या?" उसकी सहेली चिंता से भर…

May 1, 2024

अनुपमा फेम रुपाली गांगुली ने रखा राजनीति में कदम, एक्ट्रेस ने ज्वॉइन की ये राजनीतिक पार्टी (Actress Rupali Ganguly Of ‘Anupamaa’ Fame Joins BJP)

साराभाई वर्सेज साराभाई और अनुपमा जैसे पॉपुलर टीवी शो से घर घर में पहचान बनाने…

May 1, 2024

पोटच्या बाळाला निरोप देऊन त्याला अग्नीत सोपन्याहून मोठे दु:ख ते काय? शेखर सुमन शेअर केली कटू आठवण ( Shekhar Suman Express His Feeling About For Late Son Ayush )

शेखर सुमन यांनी एबीपी लाइव्ह एंटरटेनमेंटशी संवाद साधताना आपल्या दिवंगत मुलाचा उल्लेख करुन ते भावूक…

May 1, 2024
© Merisaheli