Entertainment Marathi

दीपिका पदुकोण कोणाला जन्म देणार, मुलगी की मुलगा? लोकप्रिय ज्योतिषाने केले भाकीत… (Bollywood Pandit Jagannath Guruji Predicts Deepika- Ranveer  Will Have Baby Boy Will Bring Good Luck To Couple)

जेव्हापासून रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांनी त्यांच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली आहे तेव्हापासून हे जोडपे सोशल मीडियावर अधिक चर्चेत आहे. दीपिका पदुकोण सप्टेंबरमध्ये मुलाला जन्म देणार आहे. यासोबतच दीपिका पदुकोण मुलीला जन्म देणार की मुलाला हे जाणून घेण्यासाठी आता चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

बॉलिवूड स्टार कपल रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण लवकरच आई-वडील होणार आहेत. सप्टेंबर महिन्यात दीपिका तिच्या बाळाला जन्म देणार आहे.

या स्टार जोडप्याने यावर्षी फेब्रुवारी महिन्यात सोशल मीडियावर गरोदरपणाची गोड बातमी शेअर केली होती. जेव्हापासून या जोडप्याने त्यांच्या गरोदरपणाची घोषणा केली तेव्हापासून दीपिका पदुकोण सोशल मीडियावर चर्चेत आहे.

रणवीर आणि दीपिका एकमेकांना ६ वर्षांहून अधिक काळ डेट करत होते. त्यानंतर नोव्हेंबर २०१८ मध्ये रणवीर आणि दीपिकाचे लग्न झाले.

लग्नाच्या ६ वर्षानंतर या जोडप्याच्या घरात पाळणा हलणार आहे. पण या जोडप्यापेक्षा दीपिका पदुकोणला मुलगा होणार की मुलगी हे जाणून घेण्यासाठी त्यांच्या चाहत्यांची उत्सुकता आहे. दरम्यान, रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणच्या घरी कोण येणार, असा अंदाज एका लोकप्रिय ज्योतिषाने वर्तवला आहे. बाळाच्या आगमनानंतर दाम्पत्याचे आयुष्य किती बदलणार आहे. – हा अंदाज इंटरनेटवर वेगाने पसरत आहे.

एका एंटरटेन्मेंट वेबसाइटच्या रिपोर्टनुसार, सेलिब्रिटी ज्योतिषी आणि फेस रीडर पंडित जगन्नाथ गुरुजी यांनी रणवीर आणि दीपिकाच्या आगामी मुलाबद्दल भविष्यवाणी केली होती. दीपिका पदुकोण २०२४  मध्ये गर्भवती राहणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. तिला मुलगा होईल  आणि तो त्याच्या पालकांसाठी खूप भाग्यवान असेल. असेही गुरुजींनी वर्तवले होते.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

रवीना टंडनने इतरांप्रमाणे राजकारणाची वाट का धरली नाही? अभिनेत्रीने सांगितले खरे कारण (‘Someone Would Have Shot Me…’ Raveena Tandon Gave Reason for Not Entering Politics)

गोर्जियस गर्ल रवीना टंडन ही ९० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे, जिने आपल्या फिल्मी…

November 21, 2024

जेव्हा सुष्मिता सेनने दिलेली विक्रम भट्ट यांच्यासोबतच्या नात्याची कबुली (When Sushmita Sen Said About Her Relationship With Married Vikram Bhatt)

बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स सुष्मिता सेन जवळपास 10 वेळा प्रेमात पडली होती,…

November 21, 2024

दिवंगत आई्च्या स्मर्णार्थ अर्जुन कपूरने पाठीवर कोरला टॅटू, त्यावर लिहिले रब रखा…. (Rab Rakha… Arjun Kapoor pays tribute to late mother with new tattoo, Writes emotional post)

अभिनेता अर्जुन कपूर गेल्या काही काळापासून मलायका अरोरासोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे. याशिवाय, सध्या तो रोहित…

November 21, 2024
© Merisaheli