Marathi

फरदीन खान आणि नताशा माधवानी यांच्या १८ वर्षांच्या वैवाहिक जीवनात दुरावा, दोघेही होत आहेत विभक्त? (Fardeen Khan & Natasha Madhvani To Part Ways After 18 Years Of Marriage? Deets Inside)

मुमताजची मुलगी नताशा आणि फिरोज खानचा मुलगा फरदीन खान यांचा २००५ साली विवाह झाला आणि दोन जवळच्या मित्रांचे नाते एका वेगळ्या नात्यात रुपांतरीत झाले. होय, फिरोज आणि मुमताज खूप चांगले मित्र होते आणि त्यांच्या मुलांच्या नात्यातून त्यांनी त्यांच्या मैत्रीचे रुपांतर नात्यात केले.

पण आता फरदीन आणि नताशाबाबत बातम्या फारशा चांगल्या नाहीत. अहवालांवर विश्वास ठेवला तर, फरदीन आणि नताशामध्ये सर्व काही ठीक नाही आणि दोघेही गेल्या एक वर्षापासून वेगळे राहत आहेत. होय, नताशा लंडनमध्ये राहते आणि फरदीन मुंबईत.

वृत्तांवर विश्वास ठेवला तर, फरदीन आणि नताशा हे लग्न मोडू इच्छितात, परंतु दोघांनीही अद्याप याबाबत कोणतेही वक्तव्य केलेले नाही. वृत्तानुसार, या मुद्द्यावर त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी सांगितले की, मी सध्या काहीही बोलू इच्छित नाही.

या जोडप्याला दोन मुले आहेत – एक मुलगा आणि एक मुलगी. दोघांमधील मतभेदाचे कारण अद्याप समजू शकले नाही, परंतु दोघांना आता १८ वर्षांनंतर त्यांचे वैवाहिक जीवन मोडायचे आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

ईज़ी मैरिज रेमेडीज़: मनचाहा जीवनसाथी पाने के अचूक उपाय (Easy Marriage Remedies: Surefire Ways To Get Your Desired Life Partner)

जन्म-जन्म का साथ है हमारा-तुम्हारा… ये बातें गाने में सुनने-देखने में अच्छी लगती हैं, लेकिन…

February 20, 2024

‘ऑपरेशन व्हॅलेंटाईन’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज (Operation Valentine – Official Hindi Trailer)

बॉलिवूड अभिनेत्री मानुषी छिल्लर आणि साऊथ अभिनेता वरुण तेज यांच्या मुख्य भूमिका असलेला 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'…

February 20, 2024

दीपिका पादुकोणकडे गुडन्यूज, लग्नाच्या ५ वर्षांनी होणार आईबाबा?  (Deepika Padukone-Ranveer Singh Expecting Their First Baby : As Per Source)

बॉलिवूडमध्ये अनेकदा चाहते कलाकारांच्या लग्नानंतर त्यांच्या मुलाबद्दल खूप उत्सुक असतात. काहीवेळा अभिनेत्री गर्भवती असल्याची अफवाही…

February 20, 2024

शैतान चित्रपटातील आर माधवनचा खतरनाक लूक आला समोर (Shaitaan: Madhavan’s First Look From Ajay Film Out)

रहना है तेरे दिल में पासून मॅडी या नावानं लोकप्रिय झालेल्या आर माधवनची (R Madhavan)…

February 20, 2024
© Merisaheli