स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेचं कथानक सध्या अतिशय उत्कंठावर्धक वळणावर येऊन पोहोचलं आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मालिकेत सचित राजेच्या नावाची खूप चर्चा आहे. अंकुशच सचित राजे असल्याचं भासवलं जात असलं तरी खरा सचित राजे मात्र दुसराच आहे. मालिकेत आता खऱ्या सचित राजेची एण्ट्री होणार आहे.
सुप्रसिद्ध अभिनेता सुयश टिळक सचित राजेची व्यक्तिरेखा साकारणार असून ही भूमिका साकारण्यासाठी तो प्रचंड उत्सुक आहे.अबोली मालिकेतल्या सचित राजे या भूमिकेद्दल सांगताना सुयश म्हणाला, ‘हे पात्र साकारणं खरंच आव्हानात्मक आहे. मालिकेत वेगवेगळी रुपं मी घेणार आहे. कधी मी स्त्रीवेशात असेन तर कधी वृद्धाच्या रुपात. कधी रिक्षावाला असेन तर कधी कडकलक्ष्मीच्या रुपात. अभिनेता म्हणून हे सगळं साकारताना माझी कसोटी लागतेय. एरव्ही मला तयार होण्यासाठी फार वेळ लागत नाही. मात्र ही वेगवेगळी रुपं साकारण्यासाठी तयार होताना बरीच मेहतन घ्यावी लागतेय. मी आजवर ज्या भूमिका साकारल्या आहेत त्यापेक्षा वेगळी आणि हटके अशी ही व्यक्तिरेखा आहे. सचित राजेचा मनसुबा नेमका काय आहे हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
हल्की सी बूंदाबांदी शुरू हो गई. वह बूंदों की सरगम पर फिर गुनगुनाने लगी. उसका…
गणपति बप्पा का विसर्जन करने के बाद अब अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) और विक्की जैन…
मनीषा कोइराला (Manisha Koirala) का नाम 90 के दशक की खूबसूरत एक्ट्रेसेस में शुमार है,…
मलायका अरोरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे वडील अनिल अरोरा यांनी आज सकाळी त्यांच्या फ्लॅटच्या…
मलाइका अरोड़ा (Malaika Arora) पर दुखों का पहाड़ टूट पड़ा है. उनके पापा अनिल अरोड़ा …
उस पेड़ पर कुछ पंछी उछल-कूद रहे थे. कभी वो इस डाली पर बैठते, तो…