Marathi

ग्रीन पीज पोटली (Green Peas Potali)

साहित्य : कव्हर तयार करण्यासाठी : १ कप मैदा, १/४ – १/४ कप रवा, तेल (मोहनसाठी) आणि बीटरूट पेस्ट, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल. 

स्टफिंग बनवण्यासाठी : अर्धा कप हिरवे वाटाणे (उकडलेले आणि स्मॅश केलेले), पाव कप बीटरूट (किसलेले), चवीनुसार मीठ आणि जिरा पावडर, १ टीस्पून बटर, अर्धा – अर्धा टीस्पून गरम मसाला पावडर आणि पिझ्झा मसाला. 

कृती : कव्हरसाठीचे सर्व साहित्य (तळण्यासाठी तेल सोडून) एकत्र करून मळून घ्या. आवश्यक असल्यास थोडे पाणी घाला. झाकून ठेवा. स्टफिंगसाठी, एका पॅनमध्ये लोणी वितळवून त्यात हिरवे वाटाणे आणि बीटरूट घाला आणि पाणी सुकेपर्यंत परतवा. उर्वरित सर्व साहित्य घाला आणि ४-५ मिनिटे ढवळा. आचेवरून उतरवून थंड होण्यासाठी ठेवा. कणकेचा गोळा घेऊन त्याची पुरी लाटा. त्यात सारण भरून त्यास पोटलीचा आकार द्या. कढईत तेल गरम करून ते सोनेरी होईपर्यंत तळा. हिरव्या चटणीसोबत गरमा गरम सर्व्ह करा.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

व्यंग्य- संबोधन सूचक नया शब्द…  (Satire- Sambodhan Suchak Naya Shabd…)

“अंकल, अपना बैग हटा लीजिए, मुझे बैठना है.”जनाब अंकल शब्द के महात्म से परिचित नहीं…

May 21, 2024

कतरिना कैफ गरोदर ?विकी कौशलसोबतच्या त्या व्हिडिओमुळे रंगल्या चर्चा  (Katrina Kaif Is Pregnant, Her Viral Video From London With Vicky Kaushal Sparks Pregnancy Rumours)

बॉलिवूडच्या प्रेमळ जोडप्यांपैकी एक असलेल्या विकी कौशल आणि कतरिना कैफ यांच्या लग्नाला तिसरे वर्ष पूर्ण…

May 21, 2024
© Merisaheli