अखेर 25 दिवसांपासून शोध सुरू असलेला गुरुचरण सिंग सापडला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’मध्ये सोढीची भूमिका साकारून घराघरात प्रसिद्ध झालेला हा अभिनेता गायब होता. त्याच्याबद्दल पोलिसात एफआयआरही दाखल करण्यात आला होता. हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. पण अभिनेता त्याच्याच विश्वात मग्न होता. इतके दिवस तो कुठे आणि काय करत होता याचा खुलासा त्याने केला आहे.
‘आज तक’च्या वृत्तानुसार, गुरुचरण सिंग स्वतः घरी परतला आहे. तो आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यादरम्यान अभिनेत्याने खुलासा केला की तो धार्मिक यात्रेला गेला होता. संसाराचा त्याग करून तो घरातून निघून गेला. या 25 दिवसांत तो कधी अमृतसर तर कधी लुधियानात होता. त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक शहरांतील गुरुद्वारांमध्ये मुक्काम केला होता. आता घरी परतले पाहिजे हे लक्षात येताच तो आला.
गुरुचरण चरण सिंह 22 एप्रिल रोजी दिल्लीहून मुंबईला रवाना झाला. मात्र तो शहरात अजिबात पोहोचला नसल्याचे 26 एप्रिल रोजी उघड झाले. दिल्ली विमानतळावर तो दिसला पण त्यानंतर तो कुठे गेला हे कोणीच पाहिले नाही. त्यानंतर वडिलांनी पालम पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे विश्लेषण केले. ज्यामध्ये रोज नवनवीन सुगावा मिळत होते. परंतु अभिनेत्याबद्दल काहीही सापडले नाही.
ये तो आप जानते हैं कि बॉलीवुड स्टार बनने के बाद भी काफी सालों तक…
पिछले दिनों दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ने संदीप वांगा रेड्डी (Sandeep Reddy Vanga) की आगामी…
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…