Marathi

‘हप्पू की उल्टन पलटन’ फेम कामना पाठक ने सोडला शो, समोर आले मोठे कारण (‘Happu Ki Ultan Paltan’ Fame Kamna Pathak Announces Break From Acting share post)

सर्वाधिक लोकप्रिय कॉमेडी शो ‘हप्पू की उल्टन पलटन’मध्ये हप्पू की सिंगच्या पत्नी रज्जोची भूमिका साकारणाऱ्या कामना पाठकने या शोचा निरोप घेतला आहे, अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून या शोमध्ये काम करत होती, मात्र अचानक अभिनेत्रीने शो सोडला. कामनाने स्वतः सोशल मीडियावर पोस्ट लिहून याची माहिती दिली.

कामना पाठक ही टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय चेहऱ्यांपैकी एक आहे. कामना पाठक ‘हप्पू की उल्टान पलटन’ या कॉमेडी शोमध्ये हप्पू सिंगच्या पत्नी रज्जोची भूमिका साकारत आहे. या पात्रातून अभिनेत्रीला खूप प्रसिद्धी मिळाली. दीर्घकाळापासून या शोशी जोडलेल्या कामनाने आता या शोला रामराम केला आहे.

शोला सोडल्याची बातमी समोर आल्यानंतर, आता अभिनेत्रीनेच खुलासा केला आहे की ती काही काळ अभिनयातून ब्रेक घेण्याचा विचार करत होती. अभिनेत्रीने शो सोडण्याचे कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी शूटिंगवरून घरी जात असताना कामनाचा अपघात झाला. आणि या घटनेनंतर अभिनेत्रीला धक्का बसला आहे. तेव्हापासून कामनाला तिच्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक लांबलचक नोट लिहिली आहे. या चिठ्ठीत अभिनेत्रीने शो सोडण्याचे तिचे मन आणि कारण सांगितले आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तानुसार, कुंडली भाग्य, नागिन आणि बालिका वधू यांसारख्या लोकप्रिय शोमध्ये आपल्या अभिनय कौशल्याचा प्रसार करणारी गीतांजली मिश्रा आता ‘हप्पू की उल्टान-पलटन’मध्ये कामना पाठकच्या जागी रज्जोच्या भूमिकेत दिसणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- कंकाल (Short Story- Kankal)

सुषमा मुनीन्द्र कई कुरूप हुए हैं, जिन्होंने अपने क्षेत्र में नाम कमाया. इतना नाम कमाया…

February 8, 2025

Jewel Chief

Mix contemporary style with chic, desi looks and you’ll soon have heads turning in awe!…

February 8, 2025
© Merisaheli