१९ नोव्हेंबर ला २०२४ “आई कुठे काय करते”चं रात्री खूप उशिरा शूटिंग संपलं, २० तारखेला मतदान, आणि २१ तारखेला “आता होऊ दे धिंगाणा 3” चं “आई कुठे काय करते” च्या सहकलाकारांबरोबर शूटिंग होतं,
म्हणून मग २२ तारखेला, म्हणजेच काल माझ्या मेकअप रूम मध्ये माझं राहिलेलं काही सामान घेण्यासाठी मी शेवटचं समृद्धी बंगल्यामध्ये गेलो, बंगल्याचा सेटिंग चा जो भाग होता त्याचं तोडायचं काम चालू होतं, मला आमचा समृद्धी बंगला आधी ओळखूच नाही आला, हीच का ती वास्तु जिथे आम्ही पाच वर्ष स्वतःचं घर समजून बिनधास्त वावरत होतो,
गावाकडे यात्रा संपली की जसा तंबू , प्रोजेक्टर गुंडाळून ट्रक मध्ये टाकून दुसऱ्या गावी घेऊन जायचे, तसंच हा समृद्धी बंगल्याचा सेट पाडून, नवीन मालिकेचा सेट तिथे उभा करणार आहेत बहुतेक.
आज त्या बंगल्याकडे बघताना खूप वाईट वाटलं, DKP चे राजनशाही सर, आणि स्टार प्रवाह यांनी मिळून किती सुंदर समृद्धी बंगला बांधला होता, अगदी पाच वर्ष खरोखर एक सुंदर घर वाटत होतं, त्यातली माणसं खरी खरी वाटत होती, आणि आज काही क्षणातच त्यातली सगळी माणसं आपापल्या गावी निघून गेली, एका क्षणात ते घर नव्हतं तर एक सेट होता हे प्रकर्षाने जाणवलं,
यालाच जीवन ऐसे नाव म्हटलं जातं बहुतेक, आपल्या संस्कृतीमध्ये सुंदर सुंदर गणपती च्या मुर्त्या बनवल्या जातात, रोज तिची आराधना पूजा केली जाते, आणि काही दिवसांनी ती सुंदर मूर्ती पाण्यामध्ये विसर्जन करून टाकली जाते, तसंच काहीसं सिनेमांचं आणि मालिकेंचं होत असावं,
खरंतर हे मला खूप वर्षांपूर्वी जाणवलं होतं, this is an imaginary world, illusionary world, एका लेखकाच्या कल्पनेत एक कुटुंब येतं एक कथा येते, त्या कुटुंबाला शोभणार घर, आर्ट डायरेक्टर तयार करतो, राज्यातल्या वेगवेगळ्या भागातून अनेक वस्तू गोळा करून त्या घरामध्ये आणतो, स्वयंपाक घर, देवघर, हॉल, बेडरूम, कोणाला विश्वास बसणार नाही पण या समृद्धी बंगल्यामध्ये 40 लोकेशन तयार केली गेली होती, अक्षरशः कोर्ट रूम पण, पोलीस स्टेशन, सगळे ऑफिसिअस, आश्रम, हॉस्पिटल्स, 90% शूटिंग आम्ही या बंगल्यातच केलं, फक्त गाडीतले आणि रस्त्यावरचे काही सीन्स समृद्धी बंगल्याच्या बाहेर करत होतो, ते पण दोन चार किलोमीटरच्या परिसरात.
तीन वेळा फक्त फिल्मसिटीला डी के पी च्या अनुपमाच्या सेटवर आम्ही जाऊन शूटिंग केलं होतं. समृद्धीच्या सेटवरचं तुळशी वृंदावन पण dismantle केलं, पण मी मात्र त्यातलं तुळशीचे रोप माझ्यासाठी राखून ठेवलं, ते मला हवंय असं सांगितल्यावर कोणीही नाही म्हणाला नाही. समृद्धी बंगल्यातल्या असंख्य आठवणी आणि अंगणातली तुळस घेऊन बाहेर पडलोय.
विकी कौशल (Vicky Kaushal/, अक्षय खन्ना (Akshay Khanna), रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) स्टारर फिल्म 'छावा'…
Every bride wants to look her gorgeous best on her D-day and also a magical,…