मराठमोळी अभिनेत्री मृणाल ठाकूरने दोन नवीन फ्लॅट खरेदी केले आहेत. विशेष म्हणजे मृणालने हे दोन्ही फ्लॅट कंगना रणौतच्या कुटुंबाकडून विकत घेतले आहे. मृणालने कंगनाचा भाऊ अक्षत दीप रणौतकडून फ्लॅट खरेदी केले आहे. दुसरा फ्लॅट कंगनाचे वडील अमर दीप रणौत यांच्याकडून खरेदी करण्यात आल्याचे बोलले जाते. सध्या मृणाल त्याच फ्लॅटमध्ये राहत आहे.
एका अपार्टमेंटचा एरिया ९४.४६ चौरस मीटर आहे, त्यावर ३० लाख रुपये मुद्रांक शुल्क भरण्यात आले आहे. दुसऱ्या अपार्टमेंटचे क्षेत्रफळ ९२.६६ चौरस मीटर आहे, त्यासाठीही ३० लाख रुपये मुद्रांक शुल्क दिले आहे. या फ्लॅटची किंमत सुमारे १० कोटी रुपये असून हे फ्लॅट मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे आहेत.
हिंदुस्तान टाईम्सच्या बातमीनुसार, या दोन्ही अपार्टमेंटच्या नोंदणी २५ जानेवारी २०२४ रोजी झाली होती. फ्लॅट खरेदी करण्याबाबत अभिनेत्रीकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
सीता रामम या तेलगू चित्रपटामुळे मृणाल ठाकूर खूप लोकप्रिय झाली. तेलगू सह हिंदीतही हा सिनेमा सुपरहिट झाला. या सिनेमामुळे तिची बरीच फॅन फॉलोविंग वाढली. तसेच काही दिवसांपूर्वी तिने मराठी सिनेमांमध्येही काम करण्याची इच्छा व्यक्त केली.
लव सोनिया या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. सुपर ३०, बाटला हाऊस, घोस्ट स्टोरीज, तुफान, धमाका, जर्सी असे चित्रपट तिनेकेले.
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…