FILM Marathi

आर्थिक परिस्थितीमुळे नर्गिस फाखरीने केलेले रस्त्यावरील बर्फ साफ करण्याचे काम, वाचा तिचा खडतर प्रवास (Nargis Fakhari has Done Work of Removing Snow from Road for Money, Actress did Lots of Struggle in Her Childhood)

बॉलिवूड अभिनेत्री नर्गिस फाखरी हिने ‘रॉकस्टार’ चित्रपटात काम केले तेव्हा तिने आपल्या दमदार भूमिकेने आणि सौंदर्याने सर्वांना वेड लावले. त्या सिनेमानंतर ती चर्चेत आली. 2011 मध्ये रिलीज झालेल्या या चित्रपटाने नर्गिसला रातोरात स्टार बनवले, त्यानंतरही ती अनेक चित्रपटांमध्ये दिसली. पण  नर्गिससाठी बॉलिवूड इंडस्ट्रीत या स्थानावर पोहोचणे अजिबात सोपे नव्हते, कारण तिचे बालपण खूप संघर्षात गेले. तिला पैसे कमावण्यासाठी रस्त्यावरील बर्फ काढण्यासारखे काम देखील करावे लागले. चला जाणून घेऊया अभिनेत्रीच्या आयुष्याशी संबंधित काही रंजक किस्से…

नर्गिसचा जन्म 20 ऑक्टोबर 1979 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला, पण तिचे मन भारतातच रमले. मोहम्मद फाखरी आणि मेरी फाखरी यांची मुलगी नर्गिस स्वतःला जागतिक नागरिक मानते. खरे तर तिचे वडील पाकिस्तानचे तर आई चेक रिपब्लिकची आहे.

नर्गिस अवघ्या सहा वर्षांची असताना तिच्या पालकांचा घटस्फोट झाला. काही काळानंतर वडिलांचे निधन झाले. आई-वडिलांच्या वियोगाचे दुःख कमी झाले नव्हते. लहान वयातच आई-वडील विभक्त झाल्यामुळे आणि वडील गमावल्यामुळे नर्गिसचे बालपण खूप संघर्ष, गरिबी आणि दुःखात गेले.

असे म्हटले जाते की तिची आई निर्वासित म्हणून अमेरिकेत आली होती, जिथे निर्वासित छावणीत तिची मोहम्मद फखरीशी भेट झाली आणि दोघांनी लग्न केले. मात्र, त्यांच्या विभक्त झाल्यानंतर नर्गिसच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट झाली, त्यामुळे नर्गिसला अगदी लहान वयातच काम करावे लागले. पैशासाठी रस्त्यावरून बर्फ हटवण्याचे कामही नर्गिसने केले.

नर्गिसचे बालपण खडतर परिस्थितीत गेले असले तरी ती अभ्यासात अतिशय हुशार होती, त्यामुळे कठीण परिस्थितीचा सामना करत तिने ललित कला तसेच मानसशास्त्रात पदवी संपादन केली. नर्गिसला व्यवसायाने शिक्षिका व्हायचे असले तरी तिला जग फिरायचे होते, त्यामुळे तिने मॉडेलिंगमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

मॉडेलिंगच्या जगात प्रवेश केल्यानंतर नर्गिसने ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, थायलंड, हाँगकाँग, जर्मनी आणि ब्रिटन यांसारख्या देशांतील अनेक मॉडेलिंग एजन्सींसोबत काम केले. मात्र, 2009 मध्ये जेव्हा नर्गिस किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली तेव्हा तिला खूप प्रसिद्धी मिळाली आणि इथून तिच्यासाठी बॉलिवूडचा मार्ग खुला झाला, त्यानंतर तिला पहिला चित्रपट मिळाला.

किंगफिशरच्या कॅलेंडरमध्ये नर्गिसला पाहिल्यानंतर इम्तियाज अलीने तिला ‘रॉकस्टार’ चित्रपटाची ऑफर दिली, ज्यामध्ये तिने हीर कौलची भूमिका केली होती. या चित्रपटातून रातोरात प्रसिद्धी मिळवल्यानंतर नर्गिसने ‘मद्रास कॅफे’, ‘मैं तेरा हीरो’, ‘अजहर’ आणि ‘अमावस’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. एक उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच नर्गिस एक प्रतिभावान गायिका देखील आहे.

आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी नर्गिस अनेक वादातही अडकली आहे. तिची एक जाहिरात पाकिस्तानच्या उर्दू वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली होती, ज्यामध्ये ती मोबाईल फोनसह लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली होती, ज्यामुळे बराच वाद झाला होता. याशिवाय ती तिच्या अनेक वादग्रस्त विधानांमुळेही चर्चेत आली आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सलमान खान के घर के बाहर चली गोलियां, बाइक पर सवार थे दो अज्ञात लोग, जांच में जुटी पुलिस (Firing Outside Salman Khan House Two People Came On Bike)

बॉलीवुड के भाईजान और फैंस की जान कहे जाने वाले सलमान खान के मुंबई स्थित…

April 14, 2024

लघुकथा- असली विजेता (Short Story- Asli Vijeta)

उनके जाने के बाद उसने दुकान को पूर्ववत ही संभाल रखा था.. साथ ही लेखिका…

April 13, 2024
© Merisaheli