Entertainment Marathi

नीना गुप्ता यांनी विमानतळावरील लाऊंजमध्ये प्रवेश नाकारल्याबद्दल व्यक्त केली खंत; म्हणाल्या “अजून मी VIP बनू शकले नाही” (Neena Gupta Denied Entry At Airport Reserved Lounge Says Abhi Tak VIP Nahi Bani)

अभिनेत्री नीना गुप्ता यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. नीना यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. बरेली विमानतळावर राखीव लाऊंज (आरक्षित विश्रामगृह) मध्ये प्रवेश न मिळाल्याची माहिती नीना यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. यावर नेटकऱ्यांकरून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

नीना गुप्ता या सोशल मीडियावरही चांगल्याच सक्रिय असतात. नुकतंच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्यामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या आहेत. बरेली विमानतळावर राखीव लाऊंज (आरक्षित विश्रामगृह) मध्ये प्रवेश न मिळाल्याची माहिती नीना यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. आपण व्हीआयपी नसल्याने याठिकाणी आपल्याला प्रवेश नाकारल्याचं नीना गुप्ता यांनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे.

या व्हिडिओमध्ये नीना बोलतायत, “मी बरेली एअरपोर्टवर आहे आणि हा एअरपोर्टवरील रिझर्व्ह लाऊंज आहे. जिथे जाऊन मी एकदा बसली होती. मात्र आज मला तिथे जाऊ दिलं नाही. हे रिझर्व्ह लाऊंज व्हीआयपी लोकांसाठी असतं आणि मला असं वाटलं की मी व्हीआयपी आहे. मात्र मी अजून व्हीआयपी बनू शकले नाही. कदाचित मला व्हीआयपी बनण्यासाठी आणखी बरीच मेहनत करावी लागणार आहे. त्यामुळे चांगलंच आहे, यानिमित्ताने मी व्हीआयपी बनण्यासाठी आणखी मेहनत करीन. धन्यवाद.”

हा व्हिडिओ पोस्ट करत नीना यांनी कॅप्शनमध्ये रडण्याचे इमोजी पोस्ट केले आहेत. नीना यांच्या व्हिडिओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत.

योग्य व्यक्तींची किंमत कशी करावी हे या लोकांना माहीत नाही, अशी कमेंट एका युजरने केली. तर तुम्ही जिथे बसाल तोच एरिया व्हीआयपी बनेल. तुम्हाला त्या रिझर्व्ह लाऊंजची काहीच गरज नाही, असं दुसऱ्याने म्हटलं आहे. तुम्ही तुमच्या प्रामाणिकतेमुळे नेहमीच आमच्यासाठी व्हीआयपी आहात, असंही नेटकऱ्यांनी कमेंट बॉक्समध्ये लिहिलंय. तर या देशात फक्त राजकारणीच व्हीआयपी आहेत, अशी तक्रार काहींनी केली.

नीना गुप्ता या नुकत्याच ‘मिसेस चॅटर्जी वर्सेस नॉर्वे’ या चित्रपटात झळकल्या होत्या. याशिवाय त्यांनी विशाल भारद्वाज यांच्या ‘चार्ली चोप्रा अँड द मिस्ट्री ऑफ सोलंग वॅली’ या वेब सीरिजमध्येही काम केलं. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या ‘लस्ट स्टोरीज 2’ मधील एका कथेतही त्यांनी भूमिका साकारली आहे. नीना गुप्ता या लवकरच अनुराग बासू यांच्या ‘मेट्रो इन दिनो’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli