Marathi

पंतप्रधान मोदींच्या ‘या’ गाण्याला मिळाले ग्रॅमी अवॉर्ड्ससाठी नामांकन, भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट (Pm Modi Song On Millets Featuring Got Grammy Nomination)

पंतप्रधान मोदींनी लिहीलेलं ‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणे ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४ च्या सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स श्रेणीमध्ये नामांकित झाले आहे. शुक्रवारी आलेल्या ग्रॅमी अवॉर्ड्स २०२४ च्या यादीत ‘अबंडन्स इन मिलेट्स’ला नामांकन मिळाल्याची आनंदाची बातमी सर्वांना मिळाली.

जगातील सर्वात प्रतिष्ठित ग्रॅमी अवॉर्ड्सच्या नामांकनात एखाद्या नेत्याला स्थान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. हे गाणे प्रामुख्याने बाजरीची लागवड आणि त्याची उपयुक्तता सांगते. पंतप्रधान मोदींनी लिहिलेल्या आणि दिलेल्या भाषणाचा वापर या गाण्यात करण्यात आला आहे. या गाण्यात फाल्गुनी शाह आणि गौरव शाह यांच्याबरोबरच मोदीदेखील दिसतात.

आंतरराष्ट्रीय बाजरी वर्षाच्या निमित्तानं जूनमध्ये पंतप्रधान मोदींचा समावेश असलेला ‘अबंडन्स इन मिलेट्स’ हे गाणं प्रदर्शित करण्यात आलं होतं. फलूच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, जागतिक भूक कमी करण्यासाठी बाजरी खूप उपयुक्त आहे. त्यामुळे बाजरीबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हे गाणं तयार करण्यात आलं होतं.

भूक दूर करण्यासाठी बाजरी किती महत्त्वाची असू शकते हे यावरून दिसून येते. बाजरी हे भरड धान्य आहे आणि पंतप्रधान मोदींनी अनेकवेळा जगभरातील देशांना भरडधान्य पिकवण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. अॅबडन्स इन मिलेट्स हे गाणे १६ जूनला रिलीज झाले. हे गाणे रिलीज होण्यापूर्वी फाल्गुनी शाहने स्वतः सांगितले की, हे गाणे मी आणि माझे पती गौरव शाह यांनी पीएम मोदींसोबत लिहिले आहे.

ग्रॅमी २०२४ च्या यादीत एकूण सात गाण्यांना ‘बेस्ट ग्लोबल म्युझिक परफॉर्मन्स’ श्रेणीत नामांकन मिळाले आहे. यामध्ये ‘शॅडो फोर्सेस’साठी अरुज आफताब, विजय अय्यर आणि शेहजाद इस्माइली, ‘अलोन’साठी बर्ना बॉय, ‘फील’साठी डेव्हिडो, ‘मिलाग्रो वाई डिझास्टर’साठी सिल्वाना एस्ट्राडा, बेला फ्लेक, एडगर मेयर आणि झाकीर हुसेन फूट, तसेच ‘पश्तो’ साठी राकेश चौरसियांना नामांकन मिळालंय, याशिवाय ‘टोडो कोलरस’ या गाण्यांचा समावेश आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

सलमान खान के घर के बाहर चली गोलियां, बाइक पर सवार थे दो अज्ञात लोग, जांच में जुटी पुलिस (Firing Outside Salman Khan House Two People Came On Bike)

बॉलीवुड के भाईजान और फैंस की जान कहे जाने वाले सलमान खान के मुंबई स्थित…

April 14, 2024

लघुकथा- असली विजेता (Short Story- Asli Vijeta)

उनके जाने के बाद उसने दुकान को पूर्ववत ही संभाल रखा था.. साथ ही लेखिका…

April 13, 2024
© Merisaheli