‘द जोनास ब्रदर्स’ने मुंबईतील लोलापालूझा म्युझिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी आपल्या दमदार परफॉर्मन्सने शो मध्ये उपस्थितांची मनं जिंकली. निक जोनास, जो जोनास, केविन जोनास यांनी प्रेक्षकांसमोर त्यांची हिट गाणी गायली. प्रियांका चोप्राचा पती निकनेही चाहत्यांना सरप्राईज दिले. त्याने ‘मान मेरी जान…’ गायले तेव्हा लोक उड्या मारून ‘जिजू जीजू’ ओरडू लागले.
निक जोनास, केविन जोनास आणि जो जो जोनास यांनी शनिवारी मुंबईतील लोलापालूजा इंडिया म्युझिक फेस्टिव्हलच्या पहिल्या दिवशी सादरीकरण केले. हा त्यांचा भारतातील पहिला क़न्सर्ट होता.
निक जोनासचा व्हिडिओ व्हायरल
निक जोनासने आपल्या भावांसोबत हिट गाणी गायली. यानंतर त्याने ‘तू मान मेरी जान…’ देखील गायले, ज्यावर लोक नाचू लागले. सगळ्यांना इतका आनंद झाला की ते त्याला प्रेमाने ‘जिजू जिजू’ म्हणू लागले. निकचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांच्या प्रेमकहाणीची सुरुवात मेट गाला 2017 मध्ये झाली. डेटींगनंतर दोघांनी 2018 साली उम्मेद भवन पॅलेसमध्ये ग्रँड वेडिंग केले होते. 2022 मध्ये सरोगसीद्वारे मुलगी मालती मेरीचा जन्म झाला. प्रियांकाच्या ‘लव्ह अगेन’ चित्रपटात निकने छोटी भूमिका केली होती.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…