Close

प्रजासत्ताक दिनी हे देशभक्तीपर सिनेमे पाहायला विसरु नका, काही आहेत सत्यघटनेवर आधारित ( Republic Day 2024 Special Bollywood Movie List )

आज भारत देश ७५ वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे. अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये देखील देशभक्ती पाहायला मिळाली. आज या खास दिवशी हे काही सिनेमे आवर्जून पाहा.

शेरशाह


२०२२ मध्ये प्रदर्शित झालेला सिद्धार्थ मल्होत्रा आणि किआरा अडवाणीचा चित्रपट शेरशाह हा देखील आजच्या दिवशी पाहण्यासाठी उत्तम पर्याय आहे. परमवीर चक्राने सन्मानित कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. प्राइम व्हिडिओवर हा सिनेमा पाहता येऊ शकतो.

एल ओ सी कारगिल


२००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची कथा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील १९९९ मध्ये झालेल्या कारगिल युद्धावर आधारित आहे. जेपी दत्ता यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात कारगिल शहिदांच्या गोष्टी आहेत. अजय देवगण, अरमान कोहली, संजय दत्त, नागार्जुन, सैफ अली खान, सुनील शेट्टी, अभिषेक बच्चन, मोहनीश बहल, अक्षय खन्ना, मनोज बाजपेयी, आशुतोष राणा, राणी मुखर्जी, करीना कपूर, एशाडोना, एशाडोना असे अनेक नामवंत कलाकार या सिनेमात आहेत.

'रंग दे बसंती'


आमिर खानचा ब्लॉकबस्टर चित्रपट 'रंग दे बसंती' कोण विसरू शकेल. हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक हमखास भावूक होतात. मैत्री आणि देशभक्ती या दोन्ही गोष्टी या सिनेमात उत्तम दाखवल्या होत्या. या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आलेले.

उरी : द सर्जिकल स्ट्राइक


पाकिस्तामध्ये भारताने केलेल्या सर्जिकल स्ट्राइकवर हा सिनेमा आधारित आहे. अभिनेता विकी कौशलने या सिनेमात मुख्य भूमिका साकारली आहे. या सिनेमात दाखवलेली दृष्य अंगावर काटा आणणारी आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवरही सुपरहिट ठरलेला.

मंगल पांडे


भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात मंगल पांडे यांचे नाव आदराने घेतले जाते. इंग्रजांविरुद्धचे पहिले सशस्त्र बंड देशभरात वणव्यासारखे पसरले. ८ एप्रिल १८५७ रोजी ब्रिटीश सैन्यातील शिपाई मंगल पांडे यांना फाशी देण्यात आली. पण त्यांनी पेटवलेली देशभक्तीची आग प्रत्येक भारतीयाच्या मनात पेटली होती. २००५ मध्ये केतन मेहता यांनी देशाच्या या महान क्रांतिकारकाच्या जीवनावर 'मंगल पांडे द रायझिंग' नावाचा चित्रपट बनवला. मंगल पांडेची भूमिका आमिर खानने केली होती.

Share this article