Close

चुकीच्या फोटोमुळे झाला घोटाळा, फराह खानचा भाऊ साजिद खानला द्यावा लागला जीवंत असल्याचा पुरावा (sajid khan share video that he is alive)

फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांबद्दल सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टी व्हायरल होतच असतात. पण त्या गोष्टीची शहानिशा न करता त्या वाचल्या जातात. वाचलेल्या गोष्टी खऱ्या आहेत असे मानून लोक त्यावर प्रतिक्रिया देऊ लागतात.

सोशल मीडियावर एका नावाच्या दोन व्यक्ती असल्यावर समोरच्याला फार गोंधळल्यासारखे होते. बॉलिवूड मध्ये देखील एका नावाचे दोन कलाकार अशा अनेक व्यक्ती आहे.

दोन दिवसांपूर्वी ज्येष्ठ अभिनेते साजिद खान यांचे निधन झाले. मदर इंडिया या चित्रपटात त्यांनी बालकलाकार म्हणून काम केले होते. या सिनेमाने त्यांनी खूप प्रसिद्धी मिळवून दिली. त्यांच्या निधनाची बातमी येताच सोशल मीडियावर त्यांचे बालपणीचे फोटो व्हायरल होऊ लागले. पण काही ठिकाणी ज्येष्ठ अभिनेते साजिद खान ऐवजी फराह खानचा भाऊ दिग्दर्शक साजिद खानचा फोटो शेअर केला जाऊ लागला. अनेकांनी त्यांलाच श्रद्धांजली वाहिली.

त्यामुळे वैतागून साजिद खान ने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यामध्ये तो पांढरा कपड्यात स्वतःला लपेटून घेतलेला दिसतो.

 पुढे मी जिवंत आहे असे सांगून, जे साजिद खान ७० वर्षांचे होते त्यांनी मदर इंडिया चित्रपटात सुनील दत्त च्या बालपणीची भूमिका साकारली होती. ते १९५१ मध्ये जन्मले आणि मी त्यानंतर २० वर्षांनी जन्मलो. त्या बिचाऱ्या ७० वर्षाच्या साजिद खान यांचे निधन झाले आहे पण मीडियामध्ये त्यांच्या फोटो ऐवजी माझे फोटो टाकले आहेत. काल रात्रीपासून सर्वजण माझ्यासाठी रेस्ट इन पिस चे मेसेज पाठवत आहेत.

 काही लोकांनी मला फोन करून तू जिवंत आहेस ना? असेही विचारले. मी मेलो नाही तर जिवंत आहे आणि तेही तुमच्या कृपेमुळेच. तुमचंच तर मनोरंजन करायचं आहे मला. पण प्लिज मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की मी जिवंत आहे आणि ज्या साजिद खान यांचे निधन झाले त्यांच्यासाठी मी मनापासून त्यांना शांती लाभो असे म्हणीन”. 

Share this article