FILM Marathi

टायगर ३ चा फर्स्ट लूक रिलीज, भाईजान म्हणाला मी येतोय ( salman khan share first poster look of tiger 3)

यशराज बॅनरच्या स्पाय थ्रिलर ‘टायगर’ फ्रँचायझी म्हणजेच ‘टायगर 3’च्या तिसऱ्या भागाची प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत आहे. सलमान खान आणि कतरिना कैफच्या आगामी ‘टायगर 3’ बद्दल चाहते खूप उत्सुक आहेत.

शनिवारी ‘टायगर 3’ चे फर्स्ट लूक पोस्टर समोर आले आहे, जे सलमान खानने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

शनिवारी सलमान खानने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर ‘टायगर 3’ चा फर्स्ट लूक पोस्टर शेअर केला. हे धमाकेदार पोस्टर शेअर करत भाईजानने कॅप्शनमध्ये  “येतो, टायगर 3 या दिवाळी 2023 ला प्रदर्शित होईल.” असे लिहिले. तुमच्या जवळच्या सिनेमागृहांमध्ये यशराज ५० आणि टायगर ३ साजरे करा.

यासोबतच टायगर हा यशराजच्या मागील स्पाय थ्रिलर ‘वॉर’ आणि ‘पठाण’ सारखा पॅन इंडिया चित्रपट असेल अशी माहितीही सलमानने दिली आहे. सलमान खान आणि कतरिना कैफचा ‘टायगर 3’ हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये रिलीज होणार आहे. ‘टायगर जिंदा है’च्या अफाट यशानंतर 6 वर्षांनी सलमान आणि कतरिना ही जोडी मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कहानी- आपने कहा था (Short Story- Aapne Kaha Tha)

सांत्वना सिसक पड़ी. एक पल को चुप रह कर अविनाश ने कहा, "सांत्वना, आज से…

July 4, 2025

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025
© Merisaheli