Marathi

सळसळत्या उत्साहाचा सण : गोव्याचा शिगमोत्सव (‘Shigmotsav’ Of Goa Is A Spring Festival Celebrated With Exciting Fervour)

दरवर्षी गोवा आपल्या राज्याला भेट देणाऱ्या लाखो अभ्यागतांना गोव्याची समृद्धी दर्शविणाऱ्या सण- उत्सवांचे निमंत्रण देतो. यातील एक सण म्हणजे शिगमोत्सव. गोवा सरकारचा पर्यटन विभाग हा पारंपरिक रंगाची उधळण करणारा सण साजरा करतो. रंगांची चौफेर उधळण, संगीत, नृत्य आणि मिरवणूक यांची रेलचेल असलेला शिगमोत्सव त्याच्या सळसळत्या उत्साहासाठी प्रसिद्ध आहे.

शिगमोत्सव उत्सवाची सुरुवात फ्लोट परेडने होते. यंदा पोंडा, कळंगुट, सांखळीम, वाल्पोई, पर्वरी, बिचोळी, पेडणे, कानाकोना, वास्को, शिरोडा, कुरचोरम(कुडचडे), क्यूपेम, धारबांदोरा, मडगाव, मापुसा, संगुएम आणि कुंकोलिम येथे २६ मार्च ते ८ एप्रिल २०२४ दरम्यान फ्लोट परेड सुरू असेल. शिगमोत्सव हा गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शविणारा, स्थानिकांना आणि पर्यटकांना आकर्षित करणारा सण आहे. तसेच प्रचंड आनंदाचा आणि एकत्र येण्याचा हा काळ आहे. हा दोन आठवडे चालणारा एक्स्ट्राव्हॅगान्झा म्हणजे संगीत, नृत्य, फ्लोट परेड आणि आनंदी उत्सव यांचं एक अदभूत मिश्रण आहे, ज्यामध्ये प्रत्येकजण गोव्याच्या रस्त्यांवर “होसे होसे” म्हणून ओरडतो.

शिगमोत्सव परेड ज्या ठिकाणी मार्गस्थ होते ते प्रत्येक ठिकाण उत्सवाशी निगडीत आपल्या अनोख्या चालीरीती आणि परंपरा पुढे आणते. राजधानी पणजीमध्ये, रंगवलेल्या मूर्ती, लोककथा आणि पौराणिक कथांमधील कथानक दर्शविणारी ज्वलंत चित्रे यांनी सुशोभित केलेल्या भव्य मिरवणुका निघतात. या मिरवणुकांमध्ये प्राचीन हिंदू धर्मग्रंथातील कथानके विस्तृतपणे तयार केलेल्या फ्लोट्सद्वारे सुंदरपणे प्रदर्शित केल्या जातात.

हा सण गोव्यातील लोकांना वसंत ऋतूचे आगमन आणि कापणीचा हंगाम साजरा करण्याची संधी देतो. पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या विविध विधी आणि चालीरीतींमध्ये सहभागी होण्यासाठी गोवेकर एकत्र येतात असा हा काळ आहे. गोव्याच्या भावनेला सामावून घेणारी सांस्कृतिक घटना प्रदर्शित करण्यासाठी हा उत्सव एक भव्य व्यासपीठ म्हणून काम करतो, ज्यामुळे कोणत्याही पर्यटकासाठी हा अनुभव अनुभवायलाच हवा.

शिगमोत्सव फ्लोट परेड हा एक दृश्य देखावा आहे, ज्यामध्ये सहभागी पारंपारिक पोशाख परिधान केलेले असतात. मोठे रंगीत झेंडे, कृत्रिम तलवारी हाती धरून आणि विविध सांस्कृतिक घटक धारण करून विस्तृत दागिन्यांनी सजलेले असतात. ढोल (गोवन वाद्य) च्या तालामुळे एक मंत्रमुग्ध वातावरण निर्माण होते, उत्साह आणि आनंदाची भावना निर्माण होते.

हा सण सर्व स्तरातील लोकांना आनंदी आणि रंगीबेरंगी वातावरणात एकत्र आणतो, जिथे प्राचीन विधी आणि आधुनिक उत्सव एकमेकांत विलीन होतात. भव्य मिरवणुकीपासून ते पारंपारिक नृत्यांपर्यंत, शिगमोत्सवाचे प्रत्येक पैलू गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा पुरावा आहे. गोव्याच्या संस्कृतीचा आणि राज्याच्या सभोवतालच्या चालीरीतींचा एक उत्सव आहे, ज्यामध्ये सजवलेले भव्य फ्लोट्स आहेत, पौराणिक कथांचे वर्णन केले आहे, लोकनृत्य आणि उत्साही बँड देखील आहे. शिगमोत्सव हा सर्वार्थाने आयुष्यभर जपला जाणारा आठवणींचा ठेवा असलेला उत्सव आहे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

रिश्तों में क्यों बढ़ रहा है इमोशनल एब्यूज़? (Why is emotional abuse increasing in relationships?)

रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…

July 3, 2025

कहानी- वो लड़की कम हंसती है… (Short Story- Who Ladki Kam Hasti Hai…)

नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…

July 3, 2025

आपके मोबाइल की बैटरी की सबसे ज़्यादा खपत करते हैं ये ऐप्स (These Apps Drain Your Phone’s Battery the Most)

आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…

July 2, 2025
© Merisaheli