गोव्यातील ५५ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवादरम्यान रणबीर कपूरने आलिया आणि राहा यांच्याशी संबंधित एक मनोरंजक किस्सा शेअर केला. अभिनेत्याने सांगितले की त्याने त्याची मुलगी राहा हिला पहिले गाणे कोणते ऐकवले होते. चित्रपट महोत्सवादरम्यान रणबीरने सांगितले की, त्याने पहिल्यांदा राहासाठी त्याचे आजोबा राज कपूर यांचे गाणे ऐकवले.
फिल्म फेस्टिव्हलमध्ये एका संवादादरम्यान रणबीर म्हणाला, मी पहिल्यांदा माझे आजोबा राज कपूर यांचे ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ हे गाणे राहाला ऐकवले होते. तो म्हणाला, हे गाणे माझे आवडते असून हे गाणे जीवन जगण्याचे उत्तम दर्शन आहे. ‘किसी की मुस्कुराहटों पे हो निसार’ हे गाणे अनाडी चित्रपटातील आहे. आणि हे गाणे राज कपूर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. हा चित्रपट १९५९ साली प्रदर्शित झाला होता.
पुढे बोलताना रणबीर कपूर म्हणाला, आपण आपली मुळं विसरू नयेत, आजही असे अनेक लोक आहेत ज्यांना राज कपूर यांच्या चित्रपटांबद्दल काहीच माहिती नाही, ज्यांनी त्यांचे काम पाहिले नाही. त्याने सांगितले, जेव्हा मी आलियाला पहिल्यांदा भेटलो तेव्हा तिने मला विचारले की किशोर कुमार कोण आहेत? अभिनेता म्हणाला- हे जीवनाचे चक्र आहे. कलाकारांचा विसर पडतो आणि नवे कलाकार येतात. म्हणून आपण आपली मुळे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे.
याचमुळे रणबीरने त्याचे आजोबा राज कपूर यांचे १० गाजलेले सिनेमे रिस्टोअर करण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या या गोष्टीवर काम सुरू असून रणबीर लवकरच हे सिनेमे पुन्हा रिलीज करणार आहे. आपल्या आजोबांचं काम नवीन पिढीपर्यंत पोहोचावं या उद्देशाने रणबीरने हा निर्णय घेतल्याचं त्याने उघड केलं.
लवकरच रणबीर त्याच्या आजोबांच्या नावाने फिल्म फेस्टिव्हल सुरू करणार आहे. या फिल्म फेस्टिव्हलमध्ये राज कपूर यांचे सिनेमे आणि काम नवीन पिढीला बघायला मिळेल. किशोर कुमार सुद्धा बॉलिवूडमधील महान गायक नट होते.
रणबीरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘रामायण : भाग १’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे.
कॉमेडी शो 'तारक मेहता का उल्टा चश्मा' में दयाबेन का मुख्य किरदार निभाने वाली दिशा…
रिश्ते चाहे जन्म के हों या हमारे द्वारा बनाए गए, उनका मक़सद तो यही होता…
देवोलीना भट्टाचार्जी (Devoleena Bhattacharjee) इन दिनों स्पिरिचुअल जर्नी पर हैं और पति शाहनवाज़ (Shanwaz Shaikh)…
नेहा शर्मा “सब मुस्कुराते हैं, कोई खुल कर तो कोई चुपचाप और चुपचाप वाली मुस्कुराहट…
'ये रिश्ता क्या कहलाता है' (Yeh Rishta Kya Kehlata Hai) स्टार रोहित पुरोहित (Rohit Purohit)…
आपके पास चाहे कितना भी महंगा और लेटेस्ट फीचर्स वाला स्मार्टफोन क्यों न हो, लेकिन…