लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अर्थात कलाकार मंडळी देखील याला अपवाद नाहीत. आपण पाहिलंच गेल्या काही दिवसांमध्ये टेलिव्हिजनच्या छोट्या पडद्यावरील अनेक कलाकारांनी आपल्या प्रेमाची जाहीर कबुली देत लग्न केलं. आता या कलाकारांपाठोपाठ आणखी एका अभिनेत्याने चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.
‘मुलगी झाली हो’, ‘फ्रेशर्स’, ‘जाऊबाई जोरात’, ‘हृदयी प्रीत जागते’ अशा गाजलेल्या मालिकांमुळे घराघरांत लोकप्रिय झालेल्या सिद्धार्थ खिरीड या अभिनेत्याने अलिकडेच, माझ्या आयुष्यातील ‘Single अध्याय संपला’ म्हणत प्रेमाची कुबली दिली होती. गर्लफ्रेंडबरोबरचे रोमँटिक फोटो त्याने सोशल मीडियावर शेअर केले होते. मात्र, यावेळी सिद्धार्थने आपल्या होणाऱ्या पत्नीचा चेहरा दाखवला नव्हता. त्यामुळे अभिनेत्याची गर्लफ्रेंड नेमकी कोण आहे? तिचं नाव काय आहे? असे बरेच प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात निर्माण झाले होते. अखेर अभिनेत्याने सोशल मीडियावर ड्रिम प्रपोजलचे व्हिडीओ शेअर करत आपल्या होणाऱ्या बायकोचा चेहरा लोकांसमोर आणला आहे.
सिद्धार्थ खिरीडच्या होणाऱ्या नवरीचं नाव डॉ. मैथिली भोसेकर असं आहे. मैथिली सौंदर्यवती असून तिने फ्लोरीडा इथे पार पडलेल्या सौंदर्य स्पर्धेत ‘मिस इंटरनॅशनल वर्ल्ड पेटिट २०२२-२०२३’ हा खिताब पटकावला होता. याशिवाय पॅरिस फॅशन वीकमध्ये सुद्धा मैथिली झळकली आहे. तिची पॅरिस फॅशन वीकसाठी सिग्नेचर मॉडेल म्हणून निवड झाली होती.
मैथिली कॅनडात असते. त्यामुळेच अभिनेत्याने प्रपोज करतानाचे रोमँटिक फोटो शेअर करत त्यावर हटके कॅप्शन लिहिलं आहे. “दोन हृदय, दोन देश, दोन प्रोफेशन्स आणि त्यांची एक प्रेमकहाणी…या ड्रीम प्रपोजलचा व्हिडीओ लवकरच शेअर करेन” यापुढे सिद्धार्थने ‘She Said Yes’, ‘India To Canada’ असे हॅशटॅग्ज वापरले आहेत.
दरम्यान, सिद्धार्थ खिरीडने गर्लफ्रेंडचा चेहरा दाखविल्यानंतर रसिका वेंगुर्लेकर, अमृता देशमुख, दिव्या पुगावकर, स्वाती देवल, वनिता खरात, भूमिजा पाटील, मधुरा जोशी, आशुतोष गोखले, ओंकार राऊत या सगळ्या कलाकारांनी अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
अभिनेत्री गौहर खानने तिच्या दुसऱ्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. तिने सोशल मीडियावर पती जैद दरबारसोबतचा…
- यूं तो मेरा स्वभाव है कि मैं किसी से बेवजह उलझती नहीं, लेकिन कोई…
कॉमेडियन कपिल शर्मा (Kapil Sharma) इन दिनों अपने फिजिकल ट्रांसफॉर्मेशन (Kapil Sharma's Body Transformation) को…
आई येता जाता लग्न कसे महत्त्वाचे आहे हे तिला समजावून सांगणाचा क्षीण प्रयत्न करीत होती.…
स्टार प्रवाहवर २८ एप्रिलपासून सुरु होणाऱ्या कोण होतीस तू, काय झालीस तू या मालिकेतून प्रेक्षकांची…
"मैं 45 साल का हो गया हूं. मनमौजी ज़िंदगी जीता हूं. अच्छा दोस्त बनने का…