Marathi

निरामय कामजीवन उपभोगण्याचे सोपे नियम (Simple Rules For Enjoying A Stress-Free Sex Life)

हा निसर्गाचा नियम आहे. तो जीवनाला लागू आहे. दैनंदिन जीवनात बदल करा. कामजीवनात बदल करा. मग बघा, सुखसमाधानाची अनुभूती मिळेल.


लग्नाला बरीच वर्षे झाली की, जीवनात साचेबद्धपणा येतो. दैनंदिन कृत्यांचा कंटाळा येऊ लागतो. लाईफ बोअरिंग आहे, अशी भावना निर्माण होते मुलंबाळं, ऑफिस रूटीन, घरकामं आणि नातेवाईक यांचा कंटाळा येतो याचा परिणाम कामजीवनावर देखील होतोच. सवयीचा भाग म्हणून शरीरांनी एकत्र यायचे. अन् यांत्रिकपणे कामक्रीडा करून दूर व्हायचे, असा नीरसपणा त्यात येतो
मात्र याबाबत हतबल होण्याचं काही कारण नाही. बदल हा निसर्गाचा नियम आहे. तो जीवनाला लागू आहे. दैनंदिन जीवनात बदल करा. कामजीवनात बदल करा. मग बघा, सुखसमाधानाची अनुभूती मिळेल.

पुढाकार घ्या
शरीरसंबंधात पुढाकार पुरुषांनीच घ्यायचा असतो, असा आपल्याकडे उगीचच (गैर)समज आहे. त्यामुळे इच्छा असूनही पत्नी या संबंधांसाठी पुढाकार घेत नाही. हा समज खोटा ठरवा. कधी पत्नीनेच पुढाकार घ्यावा. ऑफिसातील ओझी वाहून पतीचा जीव थकलेला असतो. घरी आल्यावर आराम करण्याची अन् गाढ झोपण्याची तीव्र इच्छा असते. त्यातच तो बळेबळेच ‘मूड’ बनवून संग करू पाहतो. अन् बिचारी पत्नी तो मूडमध्ये येण्याची वाट पाहत राहते. हे रूटीन बदला. आपण टापटीप होऊन, मंद सुगंधाचे अत्तर अंगावर शिंपडून, बेडरूममध्ये जा. अन् आपल्या प्रिय पतीला कवेत घ्या. तुम्ही घेतलेला पुढाकार खूप काही मिळवून जाईल.


वातावरण गरमच राहू द्या
शारीरिक क्रीडा झाली की, एकमेकांपासून विलग होण्याची घाई असते. तप्त झालेली शरीरं विझतात, थंड पडतात. पण ही नीरसता टाळायला हवी. म्हणजे शरीरसुखाची मौज वाढेल. शरीरसंबंधांत उत्कर्ष बिंदू गाठला तरी शरीरांचा वेढा राहू द्यावा. समाधानाची पावती म्हणून एकमेकांची चुंबने घ्यावी, अवयवांना स्पर्श करत राहावे. मिठी सोडविण्याऐवजी वाढवावी. ज्याला आफ्टर प्ले म्हणता येईल, तो प्रकार करत राहावा. म्हणजे वातावरण गरमच राहू द्या. तर या सुखाची लज्जत वाढेल. अन् कुणी सांगावं, या कृतींनी पुन्हा शरीराची धग वाढून कामक्रीडेची आणखी एक फेरी रंगेल.


भेटवस्तूंसाठी हपापू नका
काही महिलांनी आपल्या पतीदेवांना अगदी मुठीत ठेवले असते. लाडीगोडी लावत त्या आपला हट्ट पतीकडून पुरवून घेतात. असे मुठीतले पतीदेव देखील आपल्या पत्नीदेवीची मर्जी राखण्यासाठी त्यांची हौस पुरवत असतात. वेळोवेळी भेटवस्तू देत असतात. त्यात कपडे, दागिने यांचा मारा अधिक असतो, हे सांगायला नकोच. लग्नानंतरच्या नवीन नवलाईच्या दिवसात हे सगळं खूप छान, रोमॅन्टिक वाटत असलं तरी नंतरच्या नीरस जीवनात नवर्‍याच्या हिशेबी, ती एक कर्तव्यभावना होऊन बसते. बायकोला या भेटवस्तूंचा ह्व्यास अधिक असतो. लहान मुलाला एखादं खेळणं दिलं की, ते गप्प बसतं, हाच न्याय ते आपल्या बायकोबाबत लागू करतात. अन् तिची हौस पुरविण्यासाठी भेटवस्तू देणं अन् तिनं त्यामध्ये पराकोटीची खुशी मानणं, यावरच दोघांचं लक्ष केंद्रीत होतं आणि सर्वाधिक आनंद देणार्‍या कामक्रीडेकडे दुर्लक्ष होतं. तेव्हा असं घडू देऊ नका. भेटवस्तूंसाठी हपापू नका.

शरीराची योग्य निगा राखा
सेक्सक्रीडेमध्ये शरीराचे अवयव महत्त्वाचे आहेत. ते अवयव स्वच्छ, सुंदर आकारात असले तर सेक्ससुखाची मौज वाटते. त्यासाठी आपल्या शरीराची निगा व्यवस्थित राखा, आपला विषय हा नीरसतेकडे झुकणार्‍या समस्यांबाबत चालला असल्याने उतारवयात स्वतःकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती वाढीस लागते. त्यामध्ये शरीराकडे दुल्रक्ष होते. ते टाळा. नियमितपणे पार्लरमध्ये जाऊन शरीराची स्वच्छता, सुंदरता टिकवून ठेवा. फेशियल, मेनिक्युअर, पेडिक्युअर याबरोबरच वॅक्सिंग करून घ्या. अनावश्यक केस वाढले म्हणजे अव्यवस्थित दिसते जे कुणालाच आवडत नाही. त्यामुळे त्यांचे उच्चाटन वेळोवेळी करून शरीर व अवयव नितळ ठेवा. सुंदर, सुडौल आणि स्वच्छ शरीर असले की, जोडीदारास नवनवे प्रयोग करण्याची उर्मी येते. जिच्याने शरीरसुखाची मौज वाढते.


संधीची वाट पाहू नका
कामजीवनातील रूचि कमी होण्याचं एक कारण असंही असतं की, इच्छा असूनही पती-पत्नी एकत्र येऊ शकत नाहीत. त्यांना संधी मिळत नाही. विशेषतः ज्यांचं घर लहान असतं त्यांना संधी शोधावी लागते. कारण घरातील माणसं, त्यांच्या बाहेर जाण्याच्या वेळा, यातून संधी शोधावी लागते. नाइलाज असतो. परंतु, ज्यांचा राजा-राणीचा संसार आहे, त्यांनी अशा संधीची वाट पाहू नये. कारण त्यांच्या घरात नातेवाईकांची गजबज नसते. मुलांचा अडसर असू शकतो. या सर्व कारणांनी कामक्रीडेबाबत नीरसता निर्माण होऊ शकते. पण त्यावर तोडगा निघू शकतो. तेव्हा संधीची वाट पाहू नका. मिळेल ती संधी सोडू नका. शरीराच्या मीलनासाठी रात्रीची वाट पाहू नका. पहाट, दुपार, सायंकाळ या कोणत्याही वेळी मनापासून सेक्स केला तरी आनंद मिळतोच, याची जाणीव असू द्या. तेव्हा संधी गमावू नका.

shashikant pawar

Share
Published by
shashikant pawar

Recent Posts

 अनुराग कश्यपची मुलगी चढणार बोहल्यावर, हळदीचे फोटो व्हायरल (Anurag Kashyap’s Daughter, Aaliyah’s Haldi Ceremony Begins)

बॉलिवूड निर्माता आणि अभिनेता अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यपच्या लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. अनुराग…

December 9, 2024

कहानी- जीपीएस (Short Story- GPS)

संगीता माथुर लौटते समय माधवजी ने रोहन को फिर से जीपीएस चलाते देखा, तो बोल…

December 9, 2024

Money Control Tips For You

Controlling money is an art. These smart tricks will help you master it. Define your…

December 9, 2024

कहानी- इस झूठ का कोई पाप नहीं… (Short Story- Iss Jhuth Ka Koi Papa Nahi…)

मैं मां के जीवन, उनके स्वभाव, उनके व्यवहार, उनके त्याग, उनके स्नेह की एक-एक बात…

December 8, 2024
© Merisaheli