Marathi

स्वामी पाठीशी आहेत ना मग बस…. स्वप्निल जोशीने व्यक्त केली स्वामीभक्ती ( Swapnil Joshi Share About His Swami Bhakti)

नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला अभिनेता – निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे. त्याने त्याचा सोशल मीडिया वर स्वामी समर्थ यांचा एक मन प्रसन्न करणारा व्हिडिओ पोस्ट केला यातून स्वप्नील स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे दिसून येत. स्वप्नील सोबतीने त्याचा घरी सगळेच स्वामींचे भक्त आहे आणि त्याची ही भक्ती या व्हिडिओ मधून दिसून येते.

सध्या स्वप्नील त्याचा निर्मिती असलेला ” नाच गं घुमा ” चित्रपट प्रमोशन मध्ये व्यस्त आहे. बॅक टू बॅक कामाची रांग असताना स्वप्नील कामाच्या सोबतीने वैयक्तिक आयुष्य देखील तितक्याच चोखरित्या त्यांचा समतोल साधून काम करतोय. ही तारेवरची कसरत करत स्वप्नील 2024 वर्षात नवनवीन प्रोजेक्ट्स करण्यासाठी जोरदार तयारी करतोय.

स्वप्नील या बद्दल बोलताना म्हणतो ” स्वामींच माझ्या आयुष्यात खूप जवळच स्थान आहे. स्वामी म्हणतात ना भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असच कायम ते आपल्या सगळ्यांचं पाठीशी भक्कमपणे उभे आहे. स्वामीच स्मरण हे खूप सकारात्मक ऊर्जा देऊन जात आणि म्हणून किती ही कामात असलो कितीही अडचणी आल्या तरी स्वामी कायम सोबत आहे ही भावना मनात असते. कामाच्या व्यापातून वेळ काढून स्वामीच बोलावणं आलं की अक्कलकोट ची वाट दिसते स्वामीच सुंदर दर्शन होतं आणि यातून अजून जास्त काम करण्याची प्रेरणा मिळते”

स्वप्नीलची भक्ती ही सगळ्यांनी पाहिली आहे. काम आणि घर दोन्ही गोष्टीची योग्य सांगड घालून स्वप्नील सगळचं उत्तमपणे निभावून घेतोय. 2024 वर्ष हे त्याच्या साठी खूप जास्त खास आहे कारण तो अभिनयाच्या सोबतीने निर्माता सुद्धा झाला आहे आणि आगामी काळात तो अनेक मनोरंजन प्रोजेक्ट्स मधून दिसणार आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कहानी- ग्राहक (Short Story- Grahak)

रेस्टोरेंट के पुराने मालिक यानी अपने पिता की तस्वीर को ग्राहक द्वारा भावपूर्ण अंदाज़ में…

June 16, 2024

तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्रामध्ये दुरावा ? सोशल मीडियावर चर्चेला उधाण (There is a Rift in Tejasswi Prakash and Karan Kundrra Relationship? Breakup Happen Because of This Actress?)

जेव्हा जेव्हा टीव्हीच्या रोमँटिक लव्हबर्ड्सचा उल्लेख केला जातो तेव्हा सर्वात पहिले नाव येते ते म्हणजे…

June 16, 2024
© Merisaheli