Marathi

ठरलं…..दयाबेन येणारच, खुद्द तारक मेहताच्या दिग्दर्शकानेच केला खुलासा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Dayaben Aka Disha Wakani Will Return After 6 Years In The Show Director Asit Modi Confirms)

टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या आनंदाच्या बातमीला शोचे दिग्दर्शक असित मोदी यांनी दुजोरा दिला आहे. ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या शोमध्ये दयाबेनची भूमिका करणारी दिशा वकानी शोमध्ये परतणार असल्याचा खुलासा खुद्द शोचे दिग्दर्शक असित मोदी यांनी केला आहे.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमध्ये जेठालाल आणि दया बेन ही प्रेक्षकांची सर्वात लोकप्रिय जोडी आहे. पण सहा वर्षांपूर्वी ही जोडी तुटली, मात्र आता पुन्हा एकदा ही आयकॉनिक जोडी पडद्यावर एकत्र दिसणार आहे. अलीकडेच ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोचा 15 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी शोचे दिग्दर्शक असित मोदी यांनी दिशा वाकानी आणि तिच्या पात्र दयाबेनबद्दल सांगितले.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही शोमधील इतर सर्व पात्रांमध्ये दयाबेनचे पात्र सर्वात लोकप्रिय पात्र आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि मजेशीर बोलण्याने प्रेक्षकांच्या हृदयात आपला ठसा उमटवणाऱ्या दिशा वाकाणीचे गेल्या काही वर्षांत प्रचंड चाहते बनले आहेत.

अलीकडे, या मालिकेला 15 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, दिग्दर्शक असित मोदी यांनी त्यांच्या शोच्या प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी जाहीर केली आहे की ते लवकरच चाहत्यांच्या आवडत्या दयाबेन उर्फ ​​दिशा वाकानीला शोमध्ये परत आणणार असल्याचे सांगितले. असित मोदी म्हणाले- 15 वर्षांच्या या प्रवासात या शोमध्ये काम करणाऱ्या सर्व अभिनेते आणि अभिनेत्रींचे खूप खूप अभिनंदन. या प्रवासात असाच एक कलाकार आहे ज्याला प्रेक्षक किंवा आपण विसरु शकलो नाही. आणि त्या आहेत दया भाभी उर्फ ​​दिशा वाकानी.

दया भाभींनी शोमध्ये इतकी वर्षे चाहत्यांचे मनोरंजन केले, त्यांना हसवले. प्रेक्षक बऱ्याच दिवसांपासून शोमध्ये परत येण्याची वाट पाहत आहेत आणि आता मी तुम्हा सर्वांना वचन देतो की दिशा वाकानी लवकरच तारक मेहता का उल्टा चष्मामध्ये दिसणार आहे.

तारक मेहता…ने अलीकडेच 15 वर्षे यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. पण या प्रवासात दिशा वाकानी, भव्य गांधी, शैलेश लोढा, नेहा मेहता आणि राज अनाडकट या अनेक कलाकारांनी शोचा निरोप घेतला.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

कविता- बेटा और बेटी (Poetry- Beta Aur Beti)

बेटे और बेटी में है कितना अंतरये अक्सर ही सुनती आई हूं मैंचलो ये माना…

July 24, 2024

डोळ्यांवर हलकी सूज तरी कामावर परतली जस्मिन भसीन, एअरपोर्टवरील फोटो व्हायरल (Jasmine Bhasin Returned to Work With Slight Swelling Around Eyes)

छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्री आणि बिग बॉसची स्पर्धक जस्मिन भसीनच्या डोळ्यांच्या कॉर्नियाला नुकतेच नुकसान झाले…

July 24, 2024

‘घरोघरी मातीच्या चुली’ मालिकेत ऋषिकेश-जानकीचा विवाहसोहळा थाटात साजरा होणार : संगीत सोहळ्यात छोट्या उस्तादांची खास हजेरी (Marriage Anniversary Of Hrishikesh – Janaki To Be Celebrated Like Grand Wedding Ceremony In Series, ‘Gharoghar Matichya Chuli’)

स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत जानकी-ऋषिकेशच्या लग्नाची धामधूम सुरु झाली आहे. जानकी-ऋषिकेशच्या लग्नाच्या १०…

July 24, 2024

कर्करोगाशी लढा देणाऱ्या हिना खानने बॉयफ्रेंड रॉकी जैसवालसोबतचा शॉपिंगचा फोटो केला शेअर, म्हणाली तू माझी ताकद आहेस.. (Hina Khan, Who is Battling Cancer, Expressed Her Emotions for Rocky Jaiswal, Was Seen Shopping With Her Boyfriend)

'ये रिश्ता क्या कहलाता है' मधील अक्षराची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण करणारी हिना…

July 24, 2024

कहानी: खट्टी-मीठी मुस्कान… (Short Story- Khatti-Meethi Muskan…)

बच्ची अब ज़मीन पर फिर से कोई पत्थर ढूंढ़ने लगी अमरूद तोड़ने के लिए. गिट्टी…

July 24, 2024
© Merisaheli