Close

तमन्ना भाटीयाने संपुर्ण कुटुंबासह घेतले गुवाहाटीच्या कामाख्या देवीचे दर्शन, भक्तीत मग्न झाली अभिनेत्री (Tamannaah Bhatia Seeks Blessings At Kamakhya Devi Temple With Family In Guwahati)

तमन्ना भाटिया केवळ साऊथची सुपरस्टार नाही तर बॉलिवूड आणि हिंदी सिनेमांमध्येही तिचे खूप मोठे चाहते आहेत. तिचे नैसर्गिक सौंदर्य सर्वांनाच आवडते. तमन्नाने अलीकडेच कुटुंबासह कामाख्या देवीला भेट दिली, ज्याचे फोटो तिने तिच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले.

तमन्नाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती सिंपल लूकमध्ये दिसत आहे. तिने सलवार सूट घातला आहे. तिच्या हातात लाल टोपली, गळ्यात फुलांची माळ, कपाळावर टिळा आणि देवीचा दुपट्टा धरून ती खूप आनंदी दिसते.

तिच्यासोबत तिचे कुटुंबीयही उपस्थित होते. सर्वांनी गुवाहाटी येथील कामाख्या देवी मंदिराला भेट दिली. या फोटोंमध्ये ती देवीचे दर्शन घेताना दिसत आहे, आणखी एका फोटोत ती मंदिराच्या पायऱ्यांवर बसून हसताना दिसत आहे. तिने कुटुंबासोबत पोजही दिली.

कॅप्शनमध्ये लिहिले – तुमच्या प्रियजनांसोबतचे पवित्र क्षण… चाहत्यांना ही छायाचित्रे खूप आवडत आहेत. काही चाहते लोकेशनबद्दलही विचारत आहेत.

कामाख्या मंदिराबद्दल बोलायचे झाल्यास ते गुवाहाटीमधील निलांचल म्हणजेच ब्लू रॉक पर्वत रांगांवर वसलेले आहे. देवी कामाख्याचे प्रसिद्ध असे हे शक्तीपीठ आहे.

Share this article