Marathi

आज कोटींमध्ये खेळत असलेले हे कलाकार एके काळी करायचे काही रुपयांमध्ये काम, जाणून घ्या कोण आहेत असे कलाकार (the First Salary of These TV Stars will Leave you Stunned)

छोट्या पडद्यावरील अनेक कलाकार आपल्या अभिनयाच्या आणि क्षमतेच्या जोरावर वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. टीव्हीवर राज्य करणारे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी प्रत्येक एपिसोडसाठी भरमसाठ फी घेतात, परंतु त्यांच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात त्यांना कमी पैशात काम करावे लागले. कोणाला पहिला पगार म्हणून 300 रुपये तर कोणाला १५०० रुपये मिळाले होते. काही टीव्ही सेलिब्रिटींचा पहिला पगार जाणून तुम्हीही थक्क व्हाल.

कपिल शर्मा

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा हा टीव्हीचा सर्वात लोकप्रिय सेलिब्रिटी मानला जातो, तो आपल्या शो ‘द कपिल शर्मा शो’द्वारे प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करतो. कपिल या शोच्या एका एपिसोडसाठी लाखो रुपये फी घेतो, पण एक काळ असा होता की तो फोन बूथवर काम करायचा. त्या काळात कपिल शर्माला फक्त 500 रुपये पगार मिळत होता.

रश्मी देसाई

टीव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मी देसाई कोणत्याही शोमध्ये काम करण्यासाठी लाखो रुपये घेते, परंतु कधीकधी अभिनेत्रीला काहीच हजार मानधन मिळत असे. एका रिपोर्टनुसार, रश्मीने एकदा एका हेअर कंपनीसाठी फोटोशूट केले होते, ज्यासाठी तिला फी म्हणून एक हजार रुपये मिळाले होते.

सौम्या टंडन

‘भाबी जी घर पर हैं’मध्ये अनिता भाभीची भूमिका साकारणारी सौम्या टंडन ही टीव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. सौम्या तिच्या कामाचे लाखो रुपये घेते. एका रिपोर्टनुसार, सौम्या जेव्हा 10वीत शिकत होती, तेव्हा तिने एका स्थानिक केबल चॅनलमध्ये अँकरिंग करायला सुरुवात केली होती. यासाठी तिला 300 रुपये देण्यात आले.

हिना खान

टीव्हीच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक हिना खान तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. हिना ही टीव्हीवरील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री आहे. एका मुलाखतीत अभिनेत्रीने तिच्या पहिल्या पगाराबद्दल खुलासा केला होता. अभिनेत्रीच्या म्हणण्यानुसार, हिना खान जेव्हा दिल्लीत एका कॉल सेंटरमध्ये काम करायची तेव्हा तिला 40 हजार रुपये पगार मिळत असे.

कविता कौशिक

‘एफआयआर’ या लोकप्रिय टीव्ही सीरियलमध्ये चंद्रमुखी चौटालाच्या भूमिकेत दिसलेली अभिनेत्री कविता कौशिक हिचाही सुरुवातीला कमी पगारावर काम करणाऱ्या सेलिब्रिटींच्या यादीत समावेश आहे. एका रिपोर्टनुसार, कविताने कॉलेजमध्ये काम करायला सुरुवात केली होती. ती एका चॅनलवर सूत्रसंचालन, त्यासाठी तिला 1500 रुपये मानधन मिळायचे.

Akanksha Talekar

Share
Published by
Akanksha Talekar

Recent Posts

बढ़ते बिजली के बिल को कंट्रोल करने के स्मार्ट टिप्स (Smart Tips To Minimize Your Electricity Bill)

कई बार जानकारी न होने के कारण हम अनजाने में ही अपने घर के बिजली…

May 15, 2024

आयडेंटिटी (Short Story: Identity)

संगीता माथुरमाझं एक नाव आहे… माझी स्वतःची अशी आयडेंटिटी आहे. मी काम्या आहे. माझी स्वतंत्र…

May 15, 2024

बजरंगी भाईजान फेम मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा झाली १० वी पास, किती गुण मिळाले माहितीये ? ( Bajrangi Bhaijan Fame Munni Aka Harshali Malhotra Score 83 percent In 10 th Board)

बजरंगी भाईजान या सिनेमातून लोकप्रिय झालेली मुन्नी म्हणजेच हर्षाली मल्होत्रा सध्या सिनेमापासून दूर असली तरी…

May 15, 2024

कहानी- पाथेय (Short Story- Paathey)

मैं अक्सर आत्मविस्मृत होकर मुग्ध भाव से तुम्हें देखती रहती, पर मनु इसी भोली प्रक्रिया…

May 15, 2024
© Merisaheli