Marathi

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केली अलिशान प्रॉपर्टी, भाडेतत्वावर देऊन दर महिना होणार इतक्या रुपयांची कमाई (Tiger Shroff purchases lavish home in Pune He has rented this house)

आपल्या डान्स आणि ॲक्शनने चाहत्यांची मने जिंकणाऱ्या टायगर श्रॉफची फॅन फॉलोइंग खूप मोठी आहे. टायगर सध्या त्याच्या आगामी ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, हा सिनेमा येत्या 24 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, त्याच्याबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. टायगर श्रॉफने कोट्यवधींचे भव्य घर विकत घेतले आहे.

टायगर श्रॉफ रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करत आहे. यावेळी त्याने पुण्यात नवीन घर घेतले आहे . ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे. त्याच्या आलिशान घराची किंमत 7.5 कोटी रुपये आहे. खरेदी केल्यानंतर त्याने ही प्रॉपर्टी भाड्यावर दिली. आता या भाड्यातून दरमहा साडेतीन लाख रुपये मिळतील. त्यासोबतच भाड्यात दरवर्षी ५% वाढ होणार आहे.

टायगरची ही मालमत्ता हडपसर येथील प्रीमियम पुणे प्रकल्पाचा भाग आहे. त्याचे नवीन घर 4,248 स्क्वेअर फूटमध्ये पसरले आहे. रिअल इस्टेट डेटाबेस प्लॅटफॉर्म Zapkey नुसार, टायगरने ही मालमत्ता 5 मार्च 2024 रोजी खरेदी केली होती. या मालमत्तेसाठी अभिनेत्याने 52.5 लाख रुपये मुद्रांक शुल्क भरल्याचे सांगितले जात आहे.

टायगर श्रॉफने हे घर विकत घेताच भाड्याने दिले आहे. टायगरने हे घर 5 वर्षांसाठी भाड्यावर दिले आहे. भाडेकरूने टायगरला 14 लाख रुपये डिपॉझिट म्हणून दिले आहेत. दर महिन्याला टायगरला साडेतीन लाख रुपये भाडे मिळणार आहे. भाड्यात दरवर्षी ५ टक्के वाढ होणार आहे.

टायगर सध्या मुंबईतील खार परिसरात राहतो. त्याच्या 8 बीएचके अपार्टमेंटची किंमत 35 कोटी रुपये आहे. त्याच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये त्याच्या घराची झलक अनेकदा दिसली आहे.

टायगर श्रॉफचा बडे मियाँ छोटे मियाँ हा चित्रपट 24 एप्रिलला ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात टायगर श्रॉफसह अक्षय कुमार, मानुषी छिल्लर आणि अलाया एफ यांच्याही भूमिका आहेत. सध्या चित्रपटाची टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

सलमान खान के घर के बाहर चली गोलियां, बाइक पर सवार थे दो अज्ञात लोग, जांच में जुटी पुलिस (Firing Outside Salman Khan House Two People Came On Bike)

बॉलीवुड के भाईजान और फैंस की जान कहे जाने वाले सलमान खान के मुंबई स्थित…

April 14, 2024

लघुकथा- असली विजेता (Short Story- Asli Vijeta)

उनके जाने के बाद उसने दुकान को पूर्ववत ही संभाल रखा था.. साथ ही लेखिका…

April 13, 2024
© Merisaheli