Marathi

सुशांतच्या ४ थ्या पुण्यतिथीनिमित्त केदारनाथला गेली त्याची बहिण श्वेता, पवित्र वास्तूमध्ये काढली भावाची आठवण  (Sushant Singh Rajput Sister Shweta Visits Kedarnath Ahead of Actor 4th Death Anniversary)

आपल्या चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूत आता या जगात नाही, पण तो अजूनही त्याच्या कुटुंबाच्या आणि चाहत्यांच्या हृदयात जिवंत आहे. अलीकडेच, दिवंगत सुशांत सिंग राजपूतची बहीण श्वेता सिंग तिच्या भावाच्या चौथ्या पुण्यतिथीपूर्वी केदारनाथला पोहोचली.

सोशल मीडियावर खूप सक्रिय असलेल्या श्वेता सिंगला पुन्हा एकदा तिचा भाऊ आणि दिवंगत अभिनेता सुशांत सिंगची आठवण झाली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या चौथ्या पुण्यतिथीपूर्वी त्याची बहीण श्वेता सिंग केदारनाथला पोहोचली. श्वेताने या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर शेअर केली आहेत आणि तिच्या दिवंगत भावाची आठवण करून देणारी दीर्घ भावनिक चिठ्ठीही लिहिली आहे आणि ती तिच्या भावाच्या किती जवळ होती.

शेअर केलेला पहिला फोटो सुशांत सिंग राजपूतचा आहे. या फोटोमध्ये सुशांत सिंह केदारनाथ मंदिराच्या प्रांगणात ध्यान करताना दिसत आहे.

पुढच्या फोटोमध्ये श्वेता सिंह देखील मंदिराच्या प्रांगणात ध्यान करताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये श्वेता अघोरी बाबांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे. हा तोच अघोरी बाबा आहे ज्यांच्याकडून सुशांत सिंहने काही वर्षांपूर्वी आशीर्वाद घेतला होता. अमित त्रिवेदीचा नमो नमो ट्रॅक बॅकग्राउंडमध्ये वाजतोय.

चित्रांसोबत श्वेताने एक भावनिक लांबलचक नोट लिहिली आहे – आज 1 जून आहे आणि चार वर्षांपूर्वी या महिन्याच्या 14 तारखेला आम्ही आमचा लाडका भाऊ सुशांत गमावल. आजही आपण त्या दिवशी काय घडले याची उत्तरे शोधत आहोत.

मी केदारनाथला प्रार्थना करण्यासाठी आले आहे, माझ्या भावाची आठवण काढली आणि त्याच्याशी जवळीक साधली आहे. तो दिवस आमच्यासाठी अविश्वसनीय होता. केदारनाथला पोहोचताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि मला माझ्या भावनांवर ताबा ठेवता आला नाही.

इथे बसून मी ध्यान केले आणि वाटले की तो नेहमी माझ्याभोवती असतो. काही वर्षांपूर्वी तोही येथे आलेला आणि त्यांनेही येथे तप केले. इन्स्टाग्रामवरही त्याचा असा एक फोटो आहे. दुसऱ्या फोटोत तो साधू बाबांचे आशीर्वाद घेताना दिसत आहे.

श्वेताने हे फोटो इंस्टाग्रामवर शेअर करताच अभिनेत्याचे चाहते भावूक झाले आणि कमेंट करू लागले.

Akansha Talekar

Share
Published by
Akansha Talekar

Recent Posts

कद्दू के उपयोगी घरेलू नुस्ख़े (Useful home remedies of pumpkin)

कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…

July 5, 2025

काजोल- यहां हर‌ फ़ैसला एक कुर्बानी है… (Kajol- Yahaan har faisla ek kurbani hai…)

- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…

July 5, 2025

पुरुषों के इन हेल्थ सिग्नल्स को न करें नज़रअंदाज़ (Men’s health: Critical symptoms that should never be ignored)

पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…

July 5, 2025

कहानी- वे दोनों‌ (Short Story- Ve Dono)

"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…

July 5, 2025
© Merisaheli