सलमान खानच्या नुसत्या नावावरच सिनेमे कोटींची कमाई करतात. शिवाय इतर माध्यमांतूनही सलमान बक्कळ पैसे कमावतो. असे म्हटले जाते की सलमान सध्या २९०० कोटी रुपयांचा मालक आहे. तो दुसरीकडेही आपलं स्वत:च घर बांधू शकतो तरी तो अजूनही गॅलेक्सी अपोर्टमेंटमध्येच का राहतोय.
गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये जेव्हा गोळीबार झाला तेव्हा त्यावेळी सलमान खान तिथे उपस्थित होता. मात्र, तो सुखरूप आणि सुरक्षित आहे. सलमान खान ईद-दिवाळी किंवा त्यांचा वाढदिवस अशा वेगवेगळ्या प्रसंगी आपल्या घराच्या बाल्कनीत येतो आणि चाहत्यांची भेट घेतो. आतून, हे अपार्टमेंट इतर फिल्म स्टार्सच्या घरांसारखे किंवा बंगल्यासारखे आलिशान नाही. सलमानच्या मनात आलं तर तो कुठेही दुसरीकडे जाऊन राहू शकतो आणि स्वतःचे सुंदर घर बांधू शकतो. पण तो तसे करत नाही.
सलमान खानने एकदा खुलासा केला होता की, त्याची आई सलमा खानमुळेच तो या घरात राहतो. २००९ मध्ये फराह खानच्या ‘तेरे मेरे बीच में’ या चॅट शोमध्ये सूत्रसंचालकाने सलमान खानच्या घराबद्दल विचारेल की, ‘तू सुपरस्टार आहेस आणि करोडोंची कमाई करतोस, पण तरीही तू एक बेडरुम हॉल असलेल्या घरात राहतोस कारण ते तुझ्या आईच्या घराच्या खाली आहे. यावर अभिनेता म्हणाला, ‘हो. खरं तर तो तीन बेडरूमचा हॉल आहे, पण तो एक बेडरूमचा हॉल कसा बनला हे मला माहीत नाही. सलमान खानचे घर गॅलेक्सी अपार्टमेंटच्या तळमजल्यावर आहे. तर त्याचे आई-वडील पहिल्या मजल्यावर राहतात.
फराहने पुढे विचारले होते की, ‘तू तुझ्या आईच्या जवळ राहतो याचा विचार करून तुला सुरक्षित वाटते का?’ ज्यावर सलमान म्हणाला, ‘जेव्हा मी वरच्या मजल्यावर जातो, तेव्हा मी आई आणि बाबांच्या शेजारी झोपतो.’ सलमानने अपार्टमेंटबाहेर जमलेल्या चाहत्यांच्या गर्दीबद्दल कुटुंबाच्या प्रतिक्रिया काय असते हे देखील सांगितले. काही काळासाठी का होईना, सलमानने त्याच्या चाहत्यांना भेटावे, असे पोलिस अधिकारी नेहमीच त्यांना आवाहन करतात, असे तो म्हणाला. तुमची झलक दाखवा जेणेकरून रहदारीवर परिणाम होणार नाही. अलीकडेच ११ एप्रिल रोजी ईदच्या निमित्ताने अभिनेता त्याच्या चाहत्यांना भेटला. त्याच्या बाल्कनीत आला. मात्र यावेळी गर्दी इतकी वाढली होती की त्यांना घालवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. ज्याचा व्हिडिओ समोर आला होता.
कद्दू में विटामिन ए, सी व ई के साथ-साथ फाइबर, पोटैशियम, बीटा-कैरोटीन पाए जाते हैं,…
वरुण धवन (Varun Dhawan) अपनी अपकमिंग फिल्म बॉर्डर 2 (Border 2) को लेकर लगातार चर्चा…
- 'मां' एक माइथोलॉजिकल हॉरर मूवी है. इसमें मैं लोगों को इतना डराउंगी... इतना डराउंगी…
पत्नी, बच्चों और घर के दूसरे सदस्यों के जरा-सा बीमार पड़ने पर अक्सर पुरुष तुरंत…
बॉलीवुड के फाइनेस्ट एक्टर, बेहतरीन इंसान सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) को लोग अब…
"बाकी जो समय बचेगा, उसमें हम दोनों पुराने दिनों के सहारे जी लिया करेंगे." "ठीक…