Close

ह्रता दुर्गुळे आणि अजिंक्यची जोडी पुन्हा एकत्र दिसणार, मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीने नव्या चित्रपटाचं पोस्टर केलं शेअर (Actress Hruta Durgule Shared On New Kanni Movie Poster And Declared Film Released Date)

'अनन्या', 'टाईमपास ३' चित्रपटातून तसेच त्याआधी 'दुर्वा', 'फुलपाखरु' आणि 'मन उडू उडू झालंय' यांसारख्या कलाकृतींमधून हृताने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. अभिनय शैलीच्या जोरावर मराठी सिनेसृष्टीमध्ये तिने आपले स्थान प्रस्थापित केले आहे. अशातच अभिनेत्रीने आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. नुकतंच तिने सोशल मीडियावर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत प्रदर्शनाची तारीखही जाहीर केली आहे.

मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर अभिनेत्रीने नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं आहे. "मैत्री, प्रेम आणि स्वप्नांची 'कन्नी'... ८ मार्च पासून सर्व चित्रपटगृहांत!" असं कॅप्शन देत अभिनेत्रीने पोस्टर शेअर केलं आहे. शेअर केलेल्या पोस्टरमध्ये हृता दुर्गुळे, शुभंकर तावडे, अजिंक्य राऊत, वल्लारै विराज आणि ऋषी मनोहर अशी स्टारकास्ट दिसत आहे. पोस्टरमध्ये, तिने एका टॉवरला कवटाळलेलं दिसत आहे. आणि तिच्यासोबत बाकीचेही कलाकार तिच्याकडे बोट करताना दिसत आहे. चित्रपटाच्या कथानकाबद्दल चाहत्यांना खूपच उत्सुरकता आहे.

हृताने 'अनन्या' चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. हृताने गेल्या वर्षी तिच्या वाढदिवशी अर्थात १२ सप्टेंबरला 'कन्नी' चित्रपटाची घोषणा केली. चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा समीर जोशी यांनी संभाळली आहे. ह्रता आणि अजिंक्य 'मन उडू उडू झालं' या मालिकेनंतर 'कन्नी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. उंचच उंच आकाशात उडायचे असेल तर हवी मैत्रीची, प्रेमाची, जिद्दीची 'कन्नी' असे म्हणत हृताने 'कन्नी' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आहे. या पोस्टवर चाहते कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/