आमिर खान अलीकडेच त्याची नवी प्रेयसी गौरी स्प्राटसोबत पहिल्यांदाच सार्वजनिकरित्या स्पॉट झाला. दोघेही मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकत्र आले होते. यावेळी आमिरने त्याच्या प्रेयसीचा हात धरलेला दिसला.
आमिर खान काळ्या रंगाचा अजकन आणि काळ्या-सोनेरी रंगाची शाल घातलेला दिसला. तर त्याची मैत्रीण गौरी स्प्राट फुलांच्या साडीत कार्यक्रमात पोहोचली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये, आमिर खान रेड कार्पेटवर त्याच्यासोबत आलेल्या लोकांसोबत पोज देण्यापूर्वी त्याच्या प्रेयसीकडे हात पुढे करताना दिसत आहे. गौरीने आमिरचा हात धरला आहे आणि दोघेही पापाराझींसाठी एकत्र पोज देत आहेत. पापाराझींसाठी पोझ देताना, आमिर खान संपूर्ण वेळ गौरीचा हात धरून होता. दुसरीकडे, गौरी सतत आमिरकडे पाहत होती.

नुकताच चीनमधील मकाऊ येथे मकाऊ आंतरराष्ट्रीय कॉमेडी चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता, जिथे आमिर खानला मास्टर ह्यूमर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
१४ मार्च रोजी आमिर खानने त्याचा ६० वा वाढदिवस मीडियासोबत साजरा केला. या काळात त्याने गौरीची मीडियाशी ओळख करून दिली आणि तिच्याशी असलेले आपले नाते अधिकृतपणे सांगितले. त्याआधी काही महिन्यांपासून तिचं आणि आमिरचं नाव जोडलं जात आहे. त्यांच्या सततच्या एकत्र दिसण्यामुळे त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा होत आहेत.

गौरी ही एक प्रसिद्ध लेखिका आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी व्यक्ती आहे. ती मूळची बंगळुरूची आहे, ती आमिर खानच्या प्रॉडक्शनमध्ये काम करते आणि केशभूषा व्यवसाय देखील चालवते. ती आणि आमिर गेल्या २५ वर्षांपासून एकमेकांना ओळखतात, तथापि, दीड वर्षांपूर्वी जेव्हा अभिनेत्याच्या चुलत भावाने त्यांची एकमेकांशी ओळख करून दिली तेव्हा दोघे जवळ आले. गौरी स्प्राटला तिच्या पहिल्या लग्नापासून ६ वर्षांचा मुलगा देखील आहे.