Close

कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणाशी करावा विवाह? (Perfect Life Partner According To Your Zodiac Sign)

काही अपवाद सोडता लग्न ही प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एकदाच घडणारी बाब आहे. त्यामुळे लग्नाबद्दल सगळ्यांचीच काही स्वप्नं असतात. लग्न ठरल्यानंतर आनंदासोबत एक हुरहुर देखील मनामध्ये असते. लग्नाबाबत प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. त्यातही बहुतांश लोकांना लग्नगाठ ही आधीच बांधली गेलेली असते, असंच वाटत असतं. आपलं ज्योतिषशास्त्रही हेच सांगतं की, लग्न हे जेथे व्हायचं असतं तेथेच जुळतं. लग्नगाठ ही अधिक सुयोग्य व यशस्वी ठरावी तसेच जोडीदाराची निवड योग्य व्हावी याकरिता ज्योतिषशास्त्र राशींच्या आधारे आपणांस मार्गदर्शन करतं. वैवाहिक जीवन आनंदी व सुखाचं असावं यासाठी अमुक राशीच्या व्यक्तीने कोणत्या राशीच्या व्यक्तीशी लग्न करावे याबाबतचं हे मार्गदर्शन असतं. राशींच्या परस्पर संयोगामुळे कोणते लाभ होतात, याविषयी थोडक्यात जाणून घेऊया.

 

मेष

गुण: मेष राशीच्या स्त्री/पुरुषांचा स्वभाव चंचल असतो परंतु ते सकारात्मक विचारांचे असतात. ते आकर्षक आणि प्रेरणादायी असतात आणि त्यांच्यात नेतृत्व कौशल्य असते.

जोडीदार म्हणून मेष पुरुष आणि मीन राशीच्या स्त्रीची जोडी सर्वाधिक यशस्वी मानता येते.

मेष पुरुषाची जोडी वृषभ आणि मिथुन राशीच्या स्त्रीसोबतही चांगली जमते.

जोडीदार म्हणून मेष राशीच्या पुरुषाने तुळ, मकर किंवा सिंह राशीच्या स्त्रियांची निवड केली तर अशा जोडप्यांचे वैवाहिक जीवन सामान्य असते.

या व्यतिरिक्त राशी असलेल्या स्त्रियांसोबत मेष राशीच्या पुरुषांचे विवाह फारसे सफल ठरत नाहीत.

वृषभ

गुण: वृषभ राशीच्या स्त्री-पुरुषांना सुखसमृद्धीने भरलेले जीवन जगण्याची इच्छा असते. या व्यक्ती सौंदर्य आणि कलासक्त असतात. ते थोडे गुढ प्रवृत्तीचे असतात.

–  लाइफपार्टनर म्हणून मेष, मिथुन आणि मीन राशीच्या स्त्रिया वृषभ पुरुषांसाठी अगदी सुयोग्य असतात.

–  तर कर्क, सिंह, तुळ राशीच्या स्त्रियांसोबत यांची जोडी सामान्य असते.

या व्यतिरिक्त इतर राशींच्या स्त्रियांशी जोडीदार म्हणून वृषभ राशीच्या पुरुषांचं फारसं पटत नाही. त्यांच्यामधील वैचारिक मतभेदांमुळे त्यांच्यात सतत वादविवाद होत राहतात.

मिथुन

गुण: या राशीच्या व्यक्ती सकारात्मक विचारांच्या, बडबड्या, दुस्वभावी आणि वैचारिक असतात.

– मिथुन राशीच्या पुरुषांच्या लाइफपार्टनर म्हणून मेष, वृषभ आणि तुळ राशीच्या स्त्रिया योग्य ठरतात.

–  मिथुन, धनु आणि मीन राशींच्या स्त्रीसोबत या राशीच्या पुरुषाची जोडी सर्वसाधारण ठरते.

– मिथुन राशीच्या पुरुषांनी जोडीदार म्हणून कर्क, सिंह, कन्या, वृश्‍चिक, मकर, कुंभ या राशीच्या स्त्रियांची कधीही निवड करू नये. कारण यांच्यासोबत शांत आणि सुखी वैवाहिक जीवन व्यतित करणे त्यांना कठीण होऊन बसते.

कर्क

गुण: या राशीच्या व्यक्ती अतिशय संवेदनशील, भावुक, महत्वाकांक्षी आणि नकारात्मक विचार करणाऱ्या असतात.

– लाइफपार्टनर म्हणून मेष, वृषभ आणि वृश्‍चिक राशीच्या स्त्रिया यांच्या योग्य सहचारिणी बनतात. या जोडीदारांमध्ये चांगली मैत्री असते.

– कर्क राशीचे पुरुष आणि सिंह, कन्या व तुळ राशीच्या स्त्रिया या जोडीमध्ये प्रेम आणि कुरबुर दोन्ही असतात, तरीही यांचे लग्न यशस्वी मानलं जातं.

– कर्क राशीचे पुरुष आणि कर्क, मिथुन, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशीच्या स्त्रिया यांची जोडी कधीही यशस्वी ठरत नाही.

सिंह

गुण: सिंह राशीचे स्त्री/पुरुष सकारात्मक विचारांचे, महत्वाकांक्षी, चंचल आणि आकर्षक व्यक्तिमत्वाचे असतात. या व्यक्ती प्रेमाला अधिक महत्त्व देणाऱ्या असतात आणि प्रेयसी यांच्या जीवनाचा अविभाज्य घटक असते.

यांच्यासाठी मिथुन, सिंह, तुळ राशीच्या स्त्रिया चांगल्या लाइफपार्टनर सिद्ध होऊ शकतात.

तर वृषभ, वृश्‍चिक आणि कुंभ राशीच्या स्त्रियांसोबत यांचं वैवाहिक जीवन सामान्य असतं.

अन्‌ या व्यतिरिक्त अन्य राशींच्या स्त्रियांसोबत यांची जोडी यशस्वी ठरताना दिसत नाही. 

कन्या

गुण: या राशीचे लोक सुखी व समृद्ध जीवन जगणं पसंत करतात. हे दुस्वभावी, गुढ व्यक्तिमत्त्वाचे असतात. प्रेमाशिवाय जीवन अपूर्ण आहे, असा विचार करणाऱ्या या व्यक्ती असतात.

– कन्या राशीच्या पुरुषांनी जोडीदार म्हणून मिथुन, कर्क, कन्या, वृश्‍चिक, धनु आणि मीन राशीच्या स्त्रियांची निवड करावी. या राशींसोबत त्यांचं व्यवस्थित पटतं. त्यामुळे त्यांचा संसार सुखाचा होतो.

– या व्यतिरिक्त इतर राशीच्या स्त्रियांशी यांनी लग्न केलं तर त्यांचं वैवाहिक जीवन त्रासदायक होऊ शकतं.

तुळ

गुण: तुळ राशीच्या व्यक्तींच्या जीवनात न्याय आणि आदर्श यांना अतिशय महत्त्व असतं. या व्यक्ती अतिशय वैचारिक, व्यवहारी, महत्त्वाकांक्षी, आकर्षक आणि सौंदर्यप्रेमी असतात.

 लाइफपार्टनर म्हणून मेष, सिंह आणि धनु राशीच्या स्त्रियांसोबत त्यांची जोडी अतिशय यशस्वी ठरते. तर कर्क, तुळ, मकर राशींसोबत यांची जोडी सामान्य असते.

– इतर राशीच्या स्त्रियांशी जर यांचं लग्न झालं तर संशय आणि वैचारिक मतभेदांमुळे यांच्यात सतत भांडणं होत राहतात. कधी कधी तर ही भांडणं काडीमोडापर्यंत पोहोचतात.

वृश्चिक

गुण: ही जल तत्वाची राशी आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्ती संवेदनशील, भावुक, मत्सरी, कजाग वृत्तीच्या असतात. बदला घेण्याची यांची वृत्ती असते.

– वृश्‍चिक राशीच्या व्यक्तींच्या नजरेत प्रेम म्हणजे भावुकता, ज्याचा अंत समर्पणामध्ये होतो.

– वृश्‍चिक राशीच्या पुरुषाचा संसार वृषभ, कन्या, कुंभ राशीच्या स्त्रियांसोबत सुखाचा होतो, तर  सिंह, वृश्‍चिक तसेच मकर स्त्रियांसोबत यांची लहान-मोठी भांडणं तसेच वाद होतात. यांनी वाद न घालता शांतपणे जीवन जगल्यास संसार सामान्य होईल.

परंतु या व्यतिरिक्त इतर राशीच्या स्त्रियांना यांनी जोडीदार म्हणून निवडलं तर त्यांच्या जीवनात काही ना काही विवाद होत राहतील.

धनु

गुण: धनु राशीच्या व्यक्ती नेहमी काम करण्यास तत्पर असतात. या व्यक्ती कायम ऊर्जाशील, कार्यतत्पर आणि नेहमी आपल्या लक्ष्याच्या दिशेने चालणाऱ्या असतात. प्रेम म्हणजे प्रामाणिकपणे केलेली स्वामीभक्ती आहे, असे ह्या मानतात.

मिथुन, तुला, मीन राशीच्या स्त्रिया धनुच्या पुरुषांसाठी अगदी सुयोग्य जोडीदार ठरतात.

 कन्या व कुंभ राशीच्या स्त्रिया आणि धनु राशीचे पुरुष यांची जोडी सामान्य ठरते.

याशिवाय दुसऱ्या कोणत्याही राशीच्या स्त्रियांसोबत संसार करणं त्रासदायक होतं. कारण या जोड्यांच्या स्वभावात आणि व्यवहारात जमीनअस्मानाचं अंतर असतं.

मकर

गुण: मकर राशीच्या व्यक्तींचा स्वभाव जरा गुढ असतो. गुप्तता यांना आवडते. सहानुभूती मिळवणे आणि देणे यांना आवडते. यांच्यात कमालीचा आत्मविश्वास असतो. प्रेमामध्ये स्वार्थ असू नये, समजूतदारपणा असावा, अशा मताच्या या असतात

मेष, तुळ व मकर राशीच्या स्त्रियांसोबत या व्यक्ती अतिशय सुखाचा आणि आनंदी संसार करतात.

परंतु कर्क, वृश्‍चिक व मीन राशीच्या स्त्रिया आणि मकर राशीचे पुरुष यांच्यामध्ये कधीतरी रुसवेफुगवे होतात.

मकर राशीच्या पुरुषांचे याव्यतिरिक्त अन्य राशीच्या स्त्रियांसोबत खूप वाद होतात. त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन तणावाचे होते.

कुंभ

गुण: कुंभ राशीच्या व्यक्ती प्रेमळ असतात. अतिशय सरळ स्वभावाच्या आणि गोड असतात. या व्यक्ती सकारात्मक विचाराच्या, महत्त्वाकांक्षी, गंभीर आणि संवेदनशील असतात. प्रेम करण्यास धारिष्टय लागते असं यांचं मत असतं.

वृषभ, सिंह, धनु राशीच्या स्त्रिया कुंभ राशीच्या पुरुषांच्या संसारात सुखाची पखरण करतात. मेष, वृश्‍चिक व कुंभ राशीच्या स्त्रिया या पुरुषांसाठी योग्य ठरतात, परंतु कधी कधी या जोड्यांमध्ये तणाव निर्माण होतो.

इतर राशींच्या स्त्रियांसोबत कुंभेच्या पुरुषांचा संसार फारसा यशस्वी ठरत नाही.

मीन

गुण: मीन राशीच्या व्यक्ती आकर्षक आणि आपल्या कामामध्ये हुशार असतात. दुहेरी स्वभाव आणि गुप्तता राखणाऱ्या असतात. यांच्या नजरेत प्रेम हेच सर्वस्व असतं.

यशस्वी आणि प्रेमाने भरलेल्या संसारासाठी या राशीच्या पुरुषांनी मिथुन, धनु या राशीच्या स्त्रियांना आपला जोडीदार बनविले पाहिजे..

यांनी वृषभ, कन्या वा मकर राशीच्या स्त्रियांशी विवाह केला तरी चालेल परंतु त्यांना कभी खुशी कभी गम अशा परिस्थितीतून जावं लागेल.

अन्य राशीच्या स्त्रियांना जोडीदार बनविण्याचा यांनी विचारही करू नये.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/