पलक तिवारीला आता फक्त श्वेता तिवारीची मुलगी म्हणून ओळखले जात नाही, तर तिने स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापासून ते मोठ्या ब्रँड्सचे प्रतिनिधीत्व करण्यापर्यंत ती तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी चर्चेत आहे.

पलकला अनेकदा सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानसोबत पाहिले जाते. ते अनेकदा मीडियाच्या कॅमेऱ्यात कैद न होण्याचा प्रयत्न करतात पण त्यांचा प्रयत्न फेल ठरतो. दोघांच्याही पालकांनी यावर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नसली तरी आता पलकचे वडील राजा चौधरी यांनी मात्र यावर प्रतिक्रिया दिली आहे.

एका मीडिया पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत राजाने इब्राहिम आणि पलक यांच्या नात्याबद्दल खुलेपणाने सांगितले. राजा म्हणाले की ती आता लहान मुलगी राहिलेली नाही. मोठी झाली आहे. या वयात मुलांमध्ये निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते आणि ते आनंदी असतील तर मलाही आनंद होतो. होय, जेव्हा ती दुःखी असते, तेव्हा मी देखील दुःखी होतो. तिला माहित आहे की तिला काय करायचे आहे. असो, श्वेताने मुलांचे चांगले संगोपन केले आहे.

राजा यांनी त्यांची माजी पत्नी श्वेता तिवारीचे खूप कौतुक केले. त्यांनी सांगितले की, व्यस्त आणि सिंगल मदर असूनही तिने आपल्या मुलांचे चांगले संगोपन केले आहे. तिच्यापेक्षा चांगलं संगोपन कोणी देऊ शकत होतं? जर कोणी चांगले काम केले असेल तर त्याचे श्रेय त्याला नक्कीच मिळाले पाहिजे. श्वेताने आपल्या मुलांचे खूप चांगले संगोपन केले आहे.
राजा आणि श्वेता यांचा विवाह 1998 मध्ये झाला होता आणि 2007 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता. राजा अनेक दिवसांपासून पलकला भेटला नव्हता पण आता तो त्याच्या मुलीला भेटतो आणि श्वेताची खूप प्रशंसा करतो.