बच्चन कुटुंबाची सून ऐश्वर्या रायचे सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन यांच्याशी चांगले संबंध नसल्याच्या अफवा बॉलिवूडमध्ये अनेकदा ऐकायला मिळतात. जया बच्चन आणि श्वेता बच्चन नेहमीच ऐश्वर्या रायपासून अंतर राखतात. एकदा श्वेता बच्चननेही खुलासा केला होता की तिला तिची वहिनी ऐश्वर्या रायच्या काही सवयी अजिबात आवडत नाही.
श्वेता बच्चनचे हे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.श्वेता बच्चन आणि ऐश्वर्या राय गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. श्वेता बच्चनने पॅरिस फॅशन वीकमध्ये आपल्या मुलीला सपोर्ट केला होता पण वहिनी ऐश्वर्या रायला साथ दिली नाही. ऐश्वर्या रायने नुकतेच तिचे सासरे अमिताभ बच्चन आणि मुलगी आराध्या यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे आणि त्या फोटोतून ऐश्वर्या रायने नणंद श्वेता बच्चन आणि सासू जया बच्चन यांना क्रॉप केले आहे.

अभिषेक बच्चन त्याची बहीण श्वेतासोबत चित्रपट निर्माता करण जोहरच्या चॅट शो कॉफी विथ करण या शो मध्ये गेले होते. शो दरम्यान, करणने श्वेताला ऐश्वर्याबद्दल,काय आवडते आणि काय आवडत नाही असे प्रश्न विचारले.या प्रश्नाचे उत्तर देताना श्वेता बच्चनने तिची वहिनी ऐश्वर्याबद्दल सांगितले की ती स्वत: सशक्त महिला आणि खूप चांगली आई आहे. पण ऐश्वर्याचे टाइम मॅनेजमेंट अजिबात आवडत नाही.

याशिवाय श्वेताला तिच्या वहिनीची आणखी एक सवयी आवडत नाही, ती म्हणजे ऐश्वर्याला कॉल आणि मेसेजला प्रतिसाद देण्यासाठी खूप वेळ लागतो.अलीकडेच ऐश्वर्याने एक क्रॉप केलेला फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये फक्त तिचे सासरे अमिताभ बच्चन आणि मुलगी आराध्या दिसत होती.

हा क्रॉप केलेला फोटो पाहून युजर्सनी बच्चन कुटुंबात काहीतरी बिनासल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली. ऐश्वर्याने हा फॅमिली फोटो का क्रॉप केला?

असा प्रश्न युजर्सना पडला.श्वेताने वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा फोटो शेअर केला होता. ज्यामध्ये नव्या, अगस्त्य, आराध्या आणि जया बच्चन दिसल्या होत्या.