Close

बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ आणि टॉलिवूड अभिनेते नंदामुरी बालकृष्ण व किच्चा सुदीप यांचा प्रो कबड्डी लिगला पाठिंबा (Bollywood Actor Tiger Shroff And Tollywood Actors Nandamuri Balkrishna- Kichcha Sudeep Extend Their Support To Pro Kabaddi League)

‘इंडिया की हर सांस में कबड्डी’ असे घोषवाक्य असलेल्या कॅम्पेनला सुरुवात झाली आहे. ही कॅम्पेन प्रो कबड्डी लीग या स्पर्धेच्या १० व्या मोसमानिमित्त तयार करण्यात आली आहे. देशातील अत्यंत चित्तथरारक लीग म्हणून प्रसिद्धीस पावलेली ही स्पर्धा २ डिसेंबर पासून सुरू होत असून त्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्टस्‌ नेटवर्क वर केले जाणार आहे.

विशेष म्हणजे या कॅम्पेनच्या निमित्ताने जी चित्रफीत तयार करण्यात आली आहे, त्यामध्ये बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ व टॉलिवूडचे अभिनेते नंदामुरी बालकृष्ण व किच्चा सुदीप झळकले आहेत. या रांगड्या खेळाला या अभिनेत्यांनी आपला पाठिंबा दिला आहे.

या संदर्भात टायगर श्रॉफ म्हणतो, “कबड्डीच्या मैदानात हे खेळाडू विजयासाठी निडरपणे झुंजत असतात. हे खेळाडू एखाद्या योद्ध्यासारखे असून त्यांना मी देखील प्रोत्साहन देणार आहे. इंडिया की हर सांस में कबड्डी या घोषवाक्यानुसार हा खेळ भारताच्या मातीत जन्माला आलेला देशी खेळ आहे. धाडस, समयसूचकता, संघ भावना वाढीस लावणारा हा खेळ खऱ्या अर्थाने भारताचे प्रतिबिंब दर्शविणारा खेळ आहे.”

नंदामुरी बालकृष्ण व किच्चा सुदीप यांनी देखील अशाच प्रकारे खेळाडूंना प्रोत्साहीत करणाऱ्या व कबड्डी लीगला शुभेच्छा देणाऱ्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/