Close

कतरिना कैफ आणि विजय सेतूपती यांचा बहूप्रतिक्षित मेरी ख्रिसमसचा ट्रेलर रिलीज, सस्पेन्स आणि थराराने परिपूर्ण आहे सिनेमा (Katrina Kaif and Vijay Sethupathi’s much awaited Merry Christmas trailer release )

कतरिना कैफ आणि साऊथचा सुपरस्टार विजय सेतुपती यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'मेरी ख्रिसमस' या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा होती. आता ख्रिसमसच्या मुहूर्तावर निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलरही रिलीज केला आहे. श्रीराम राघवन यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये त्यांच्या मागील 'बदलापूर' आणि 'अंधाधुन' या चित्रपटांच्या शैलीची झलक पाहायला मिळते.

'मेरी ख्रिसमस'च्या ट्रेलरच्या सुरुवातीलाच एका सुंदर प्रेमकथेची सुरुवात होताना दिसत आहे. मात्र, जसजशी कथा पुढे सरकते तसतशी फसवणूक आणि धोक्याची झलक दिसू लागते.

2 मिनिटे 20 सेकंदाचा ट्रेलर ख्रिसमसच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ दाखवतो, तो वेळ कॅटरिना आणि विजय एकत्र घालवत आहेत. यानंतर दोघेही एकत्र नाताळ सेलिब्रेट करतात आणि एकत्र खूप मजा करतात. प्रेक्षकांना जुन्या काळात घेऊन जाणारी अशी दृश्ये चित्रपटात पाहायला मिळत आहेत.

https://youtu.be/UUKdUNMgk7Q?si=Xy8GgnCUIewSHD8M

ट्रेलरमध्ये कतरिना आणि विजय सेतुपती यांच्यात रोमँटिक सीन्स पाहायला मिळत आहेत. दोघांची केमिस्ट्री अप्रतिम दिसत आहे. ट्रेलरच्या एका सीनमध्ये कतरिना एका थिएटरमध्ये एका मुलीसोबत चित्रपट बघताना दिसत आहे. पुढच्याच क्षणात विजय त्या दोघांच्या समोरच्या सीटवर शिरतो आणि मग डोळ्याच्या झटक्यात कतरिना त्या मुलीसोबत गायब होते. या दृश्यामुळे अस्वस्थता खूप वाढली आहे.

श्रीराम राघवन दिग्दर्शित 'मेरी ख्रिसमस' मध्ये कतरिना आणि विजय व्यतिरिक्त टिनू राज आनंद, संजय कपूर, राधिका आपटे, विनय पाठक, अश्विनी काळसेकर आणि प्रतिमा कानन सारखे स्टार्स देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख यापूर्वी दोनदा बदलण्यात आली आहे. आता अखेर प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर 12 जानेवारी 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/