Close

‘सुपरस्टार जोडी नंबर वन’ या डान्स रिॲलिटी कार्यक्रमाचे नवे पर्व लवकरच…(New Season Of Dance Reality Show ‘Superstar Jodi Number One’ Streaming Soon)

स्टार प्रवाहवर ९ मार्चपासून सुरू होत आहे धमाकेदार डान्स रिॲलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’. या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करणार आहेत. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पाहता येणार आहे. त्यामुळे या पर्वात मंचावर नृत्यासोबतच नात्यांमधली गंमतही अनुभवता येईल.

मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे सुपरस्टार अंकुश चौधरी. तर लोकप्रिय अभिनेत्री समृद्धी केळकर या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे. मराठी सिनेमांमध्ये आपल्या जबरदस्त नृत्यदिग्दर्शनाने वेगळी ओळख निर्माण करणारी सुप्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका फुलवा खामकर आणि हिंदी-मराठी रिॲलिटी शो गाजवणारा नृत्यदिग्दर्शक वैभव घुगे या कार्यक्रमाचे कॅप्टन आहेत.

या ग्रॅण्ड रिॲलिटी शोविषयी सांगताना सुपरजज अंकुश चौधरी म्हणाले, ‘मी होणार सुपरस्टारचं प्रत्येक पर्व हे वेगळेपण घेऊन येतं. यावेळेच्या पर्वात जोड्यांची धमाल अनुभवायला मिळणार आहे. त्यामुळे फक्त नृत्यच नाही तर या मंचावर नात्यांचाही खऱ्या अर्थाने सोहळा होईल. पहिल्या दोन्ही पर्वांना भरभरुन प्रेम मिळालं. दोन्ही पर्वातल्या स्पर्धकांच्या मी अजूनही संपर्कात आहे. त्यामुळे या मंचाने मला नवा परिवार दिलाय असं म्हणू शकतो. या पर्वातही नवनव्या स्पर्धकांना भेटण्यासाठी मी उत्सुक आहे.’

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/