Close

किरण मानेंनी व्यक्त केल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरां प्रति भावना ( Kiran Mane Share His Feeling For Dr. Baba Saheb Ambedkar )

बौद्ध धम्म स्विकारताना डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी एक पत्रक काढलंवतं, ज्यात त्यांनी तुकोबारायाच्या गाथेतल्या एका अभंगातली एक ओळ लिहीलीवती :
"जोवरी होतो तुझे सत्तेखाली । तोवरी केली विटंबना ।।"

...जोपर्यन्त मी तुझ्या धर्माच्या सत्तेखाली होतो, तुझी विचारधारा मानत होतो, तू जे सांगशील ते करत होतो... तोपर्यन्त तू माझी विटंबना केलीस, अवहेलना केलीस, हेटाळणी केलीस... म्हणून मी तुझ्यापासून दूर जातो आहे !

खुप पुर्वी कधीतरी डाॅ.आ.ह.साळुंखे तात्यांच्या मुलाखतीत हे ऐकलं होतं. त्यावेळी डोळ्यांत पाणी तरळलं होतं. अंगावर काटा आला होता...

बघा भावांनो... अजूनही विचार करा. शहाणे व्हा. कुठलाही धर्म दुसर्‍याचा द्वेष करायला सांगत नाही, मत्सर करायला सांगत नाही, गुलाम बनवत नाही, माणसाला जनावरासारखी वागणूक देत नाही. जातीधर्माच्या नांवाखाली मनं नासवून माणसामाणसांत द्वेष पेरणार्‍या बांडगुळांना वेळीच दूर करा.

मनूवाद्यांनी अस्पृश्यता, गुलामगिरी, कर्मकांड, अंधश्रद्धेत पिचवल्यामुळे, प्रतिभेचा मोहोर झडून गेलेल्या शंभर पिढ्यांचे अश्रू पुसून, त्यांच्या लेकराबाळांना 'माणूस'पण मिळवून देऊन ताठ कण्याने उभं करणार्‍या भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाला विनम्र अभिवादन.
जयभीम !

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/