ऋतूमानानुसार आपल्या दिनचर्येत आवश्यक ते बदल केल्यास बदलत्या ऋतूमुळे उद्भवणार्या समस्या अधिक त्रासदायक ठरत नाही. सध्या कडाक्याचा उन्हाळा जाणवू लागला आहे. पण आपण आपल्या दिनचर्येत बदल करून या उष्म्यावरही मात करूया. उष्णता वाढताच त्याचा सर्वात मोठा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो. उन्हाळ्यात पचनशक्ती मंदावते, त्याचबरोबर डिहायड्रेशनची समस्याही वाढते. त्यामुळे शरीराला थकवा जाणवतो, पेटके येतात आणि आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू लागतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या दिनचर्येत ऋतुमानानुसार बदल करणे गरजेचे आहे, जेणेकरून या ऋतूतही तुम्हाला निरोगी आणि ताजेतवाने वाटेल.सकाळचा दिनक्रम बदला सकाळी लवकर उठून फिरायला जा किंवा फक्त फेरफटका मारण्याची तरी सवय लावून घ्या . कारण सकाळी उष्णता कमी असते आणि ताजी हवा तुम्हालाही तजेला देते. थोडे ध्यान आणि योगासनेही करा. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल. शीतली प्राणायाम करा कारण ते शरीराचे तापमान नियंत्रित करते. शरीरातील उष्णता काढून टाकते आणि शरीराला थंड प्रभाव देते. प्राणायाम करण्यासाठी आरामदायी ठिकाणी बसा. शरीर रिलॅक्स ठेवा. जीभ बाहेर काढून दोन्ही बाजूंनी नळीप्रमाणे गुंडाळा. जिभेने श्वास घ्या आणि शेवटी जीभ आत घेऊन नाकातून श्वास सोडा. तोंडात खूप थंडावा जाणवेल. अशा प्रकारे ही प्रक्रिया 8-10 वेळा करा. सकाळी चहा-कॉफीऐवजी ताजे फळांचे रस, ताक, लिंबूपाणी किंवा नारळपाणी घ्या. सकाळी न्याहारी जरूर करा, रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका. सकाळची न्याहारी पौष्टिक असावी हे लक्षात ठेवा. जास्त तेल किंवा मसाले असलेले स्नॅक्स खाऊ नका. बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. शक्य असल्यास, आपले डोके छत्री किंवा स्कार्फने झाकून ठेवा. मेकअप कमी करा आणि मेकअप करण्यापूर्वी बर्फ लावा. आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी किंवा गुलाबाची पाने टाका. स्प्रे बॉटलमध्ये गुलाबजल भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि दिवसा चेहर्यावर स्प्रे करा. ते थंडपणा आणि ताजेपणा देईल.पोहायला जा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. कोरफड जेल लावा. ही थंड प्रभाव देईल.
घरात थंडावा राहण्यासाठी… घर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शक्य असल्यास नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करा, कारण एसीचा अतिवापर आरोग्यासाठी चांगला नाही. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्रीजरमध्ये पडलेल्या बर्फाचे ट्रे वापरणे. भरपूर बर्फ घ्या आणि टेबल फॅनसमोर ठेवा. मग पंखा चालू करा आणि त्याच्यासमोर झोपा. तुम्हाला ताजी थंड हवा मिळेल. घरात एकदम सर्व दिवे लावून ठेवू नका. कमी प्रकाशामुळे कमी उष्णता निर्माण होईल. ब्लाइंड पडदे वापरा, जेणेकरून तीव्र सूर्यकिरणे खोलीत येणार नाहीत. इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील उष्णता निर्माण करतात, त्यांचा वापर कमी करा. हेअर ड्रायर कमी वापरा. त्याचप्रमाणे, हीटिंग हेअर प्रोडक्ट्सचा वापरही कमी करा. स्वतःला ताजेतवाने वाटण्यासाठी डिओ किंवा टाल्कम पावडर वापरा. घराबाहेर पडताना ओले टिश्यू सोबत ठेवा. जेव्हा बाहेर उष्णता, धूळ आणि घाम असेल तेव्हा आपला चेहरा, मान आणि हात त्याने स्वच्छ करा. तात्काळ ताजेपणा जाणवेल.
उन्हाळ्यातही कूल व्हा हलके सुती कापडापासून बनवलेले ब्रीदेबल कपडे घाला. केशरचनाही साधी ठेवा. हलक्या रंगाचे कपडे घाला. फळं आणि थंड असलेले फेस पॅक वापरा. डोळ्यांवर थंडगार काकडी ठेवा आणि बाहेर जाताना ग्लेयर घाला. मद्यपान व धूम्रपान कमी करा. या मोसमात मांसाहाराचे प्रमाणही कमी करा. हंगामी फळे आणि भाज्या खा. सर्वात महत्वाचे म्हणजे हायड्रेटेड राहा. भरपूर पाणी प्या, लिंबूपाणी, नारळपाणी, पन्हं, ताक, टरबूजाचा रस, कोशिंबीर इत्यादीचे सेवन करा. तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक न पिता पाणी वा आरोग्यदायी पेय प्या. या मोसमात स्मूदीज् हाही उत्तम पर्याय आहे. वीकेंडला बीचवर जाऊन आनंद घ्या. मग लगेच कामाला लागा, उशीर कशाला, उन्हाळ्यातही कूल व्हा.
Link Copied

सकाळचा दिनक्रम बदला
सकाळी लवकर उठून फिरायला जा किंवा फक्त फेरफटका मारण्याची तरी सवय लावून घ्या . कारण सकाळी उष्णता कमी असते आणि ताजी हवा तुम्हालाही तजेला देते. थोडे ध्यान आणि योगासनेही करा. यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल.
शीतली प्राणायाम करा कारण ते शरीराचे तापमान नियंत्रित करते. शरीरातील उष्णता काढून टाकते आणि शरीराला थंड प्रभाव देते. प्राणायाम करण्यासाठी आरामदायी ठिकाणी बसा. शरीर रिलॅक्स ठेवा. जीभ बाहेर काढून दोन्ही बाजूंनी नळीप्रमाणे गुंडाळा. जिभेने श्वास घ्या आणि शेवटी जीभ आत घेऊन नाकातून श्वास सोडा. तोंडात खूप थंडावा जाणवेल. अशा प्रकारे ही प्रक्रिया 8-10 वेळा करा.
सकाळी चहा-कॉफीऐवजी ताजे फळांचे रस, ताक, लिंबूपाणी किंवा नारळपाणी घ्या.
सकाळी न्याहारी जरूर करा, रिकाम्या पोटी घराबाहेर पडू नका.
सकाळची न्याहारी पौष्टिक असावी हे लक्षात ठेवा. जास्त तेल किंवा मसाले असलेले स्नॅक्स खाऊ नका.
बाहेर जाताना सनस्क्रीन लावा. शक्य असल्यास, आपले डोके छत्री किंवा स्कार्फने झाकून ठेवा.
मेकअप कमी करा आणि मेकअप करण्यापूर्वी बर्फ लावा.
आंघोळीच्या पाण्यात गुलाबपाणी किंवा गुलाबाची पाने टाका.
स्प्रे बॉटलमध्ये गुलाबजल भरून फ्रीजमध्ये ठेवा आणि दिवसा चेहर्यावर स्प्रे करा. ते थंडपणा आणि ताजेपणा देईल.पोहायला जा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल. कोरफड जेल लावा. ही थंड प्रभाव देईल.
घरात थंडावा राहण्यासाठी…
घर थंड ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी शक्य असल्यास नैसर्गिक पद्धतींचा अवलंब करा, कारण एसीचा अतिवापर आरोग्यासाठी चांगला नाही. हे करण्याचा उत्तम मार्ग म्हणजे फ्रीजरमध्ये पडलेल्या बर्फाचे ट्रे वापरणे. भरपूर बर्फ घ्या आणि टेबल फॅनसमोर ठेवा. मग पंखा चालू करा आणि त्याच्यासमोर झोपा. तुम्हाला ताजी थंड हवा मिळेल.
घरात एकदम सर्व दिवे लावून ठेवू नका. कमी प्रकाशामुळे कमी उष्णता निर्माण होईल. ब्लाइंड पडदे वापरा, जेणेकरून तीव्र सूर्यकिरणे खोलीत येणार नाहीत. इलेक्ट्रॉनिक वस्तू देखील उष्णता निर्माण करतात, त्यांचा वापर कमी करा.
हेअर ड्रायर कमी वापरा. त्याचप्रमाणे, हीटिंग हेअर प्रोडक्ट्सचा वापरही कमी करा.
स्वतःला ताजेतवाने वाटण्यासाठी डिओ किंवा टाल्कम पावडर वापरा.
घराबाहेर पडताना ओले टिश्यू सोबत ठेवा. जेव्हा बाहेर उष्णता, धूळ आणि घाम असेल तेव्हा आपला चेहरा, मान आणि हात त्याने स्वच्छ करा. तात्काळ ताजेपणा जाणवेल.
उन्हाळ्यातही कूल व्हा
हलके सुती कापडापासून बनवलेले ब्रीदेबल कपडे घाला. केशरचनाही साधी ठेवा.
हलक्या रंगाचे कपडे घाला.
फळं आणि थंड असलेले फेस पॅक वापरा.
डोळ्यांवर थंडगार काकडी ठेवा आणि बाहेर जाताना ग्लेयर घाला.
मद्यपान व धूम्रपान कमी करा.
या मोसमात मांसाहाराचे प्रमाणही कमी करा.
हंगामी फळे आणि भाज्या खा.
सर्वात महत्वाचे म्हणजे हायड्रेटेड राहा. भरपूर पाणी प्या, लिंबूपाणी, नारळपाणी, पन्हं, ताक, टरबूजाचा रस, कोशिंबीर इत्यादीचे सेवन करा. तहान लागल्यावर कोल्ड ड्रिंक न पिता पाणी वा आरोग्यदायी पेय प्या.
या मोसमात स्मूदीज् हाही उत्तम पर्याय आहे.
वीकेंडला बीचवर जाऊन आनंद घ्या.
मग लगेच कामाला लागा, उशीर कशाला, उन्हाळ्यातही कूल व्हा.