कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ सुरू झाला आहे. यंदा या सोहळ्याचे ७७ वे वर्ष आहे. येथे देश-विदेशातील सेलिब्रिटी सहभागी होत रेड कार्पेटवर त्यांचा जलवा दाखवतात. कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये आदिती रॉय हैदरीपासून ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत कलाकार सहभागी होणार आहेत. आजपर्यंत अनेक स्टार्सनी येथे जलवा दाखवला आहे


कान्सच्या पहिल्याच दिवशी 'तारक मेहता का उल्टा चष्मा' फेम अभिनेत्री दिप्ती साधवानीने आपल्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं. दिप्तीने 'हास्यसम्राट' या कॉमेडी शोचं सूत्रसंचालनसुद्धा केलं होतं. कान्सच्या रेड कार्पेट लूकसाठी दिप्तीने नारंगी रंगाच्या ड्रेसची निवड केली. या ड्रेसमधील तिचा लूक पाहून दिप्ती जणू झेंडूच्या फुलासारखीच गोड दिसतेय, असं नेटकऱ्यांनी म्हटलंय. तिने इन्स्टाग्रावर हे फोटो पोस्ट केले असून त्यावर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.


दिप्ती प्रमाणेच उर्वशी रौतेलाने देखील तिच्या वेगळ्या अंदाजाने चाहत्यांचे मन जिंकले. उर्वशी पुन्हा एकदा या महोत्सवामध्ये सहभागी झाली आहे. अन् नेहमीप्रमाणे यावर्षीही तिचा अलग लूक पाहावयास मिळाला. उर्वशी नेहमीच आपल्या पेहेरावाने सगळ्यांना चकित करते. या कान्स महोत्सवासाठी ती फॅशन डिझायनर खालिद आणि मरवान यांनी डिझाइन केलेला गाऊन घालून आली. गुलाबी रंगाचा कॉर्सेट ड्रेस घालून उर्वशी रेड कार्पेटवर अवतरली होती. ड्रेससोबत तिने मॅचिंग हेडपीस परिधान केला होता, ज्यात हिरे लावले होते, तसेच हातात हिऱ्यांचे ब्रेसलेट घातले होते.
उर्वशी या लूकमध्ये अप्सरा भासत होती. खरं तर तिला पाहून २०१८ सालच्या कान्स फेस्टिव्हलमधील दीपिका पादुकोनची आठवण झाली. दीपिकाने त्यावेळी आशी स्टुडिओच्या समर/स्प्रिंग २०१८ कलेक्शनमधील हॉट पिंक कलरचा ओरिगामी गाऊन परिधान केला होता. उर्वशीच्या यंदाच्या या लूकने दीपिकाच्या त्या लूकची आठवण करून दिली.