Close

पद्मश्री अनुराधा पौडवाल यांनी स्व. अरुण पौडवाल कृतज्ञता गौरव पुरस्कार देऊन केला गायक-संगीतकार त्यागराज खाडिलकर यांचा गौरव (Singer-Composer Tyagaraj Khadilkar Awarded ‘Sw. Arun Paudwal Gratitude Award’!)

सुप्रसिद्ध अकॉर्डियन वादक, कुशल संगीत संयोजक आणि प्रतिभाशाली संगीतकार अरुण पौडवाल यांच्या स्मृती जपणारा आणि कुठलाही बडेजावपणा न आणता अत्यंत साधेपणाने घरगुती मंगलमय वातावरणात गेली २७ वर्षे साजरा होणारा 'स्व. अरुण पौडवाल यांच्या स्मृति प्रित्यर्थ देण्यात येणारा "कृतज्ञता गौरव पुरस्कार" नुकताच प्रसिद्ध गायक संगीतकार त्यागराज खाडिलकर यांना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधाजी पौडवाल यांच्या हस्ते आणि कवीता पौडवाल-तुळपुळे व पौडवाल कुटुंबियांच्या उपस्थितीत, त्यांच्या खार येथील निवास्थानी प्रदान करण्यात आला. ५१ हजार रोख रुपये आणि सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

या गौरव सन्मानाची संकल्पना विशद करताना सुप्रसिद्ध पार्श्वगायिका पद्मश्री अनुराधा पौडवाल म्हणाल्या,  "अरुणजी हे स्वतः एक अतिशय उच्चकोटीचे संगीतकार - म्युझिशियन होते. त्यामुळे  कलाकारांचा योग्य तो सन्मान व्हायला पाहिजे. बहुतेकवेळा त्यांचे फॅन्स काही सत्कार सोहळे करीत असतात. पण आर्टिस्टने एका आर्टिस्टचा सन्मान करणे याला जास्त महत्त्व आहे.

आजचा हा २७ वा सोहळा आहे. याच्या आधी ज्या ज्या कलाकारांनी अरुणजींसोबत काम केले आहे, ज्यांना त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचा स्वभाव माहीत आहे अश्या कलावंतांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्यागराज यांची निवड करण्यामागे विशेष कारण आहे. काही महिन्यापूर्वी मी त्यांच्या एका कार्यक्रमासाठी विशेष प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांनी दिव्यांग मुलांना घेऊन एक अल्बम केला होता. अशा मुलांसोबत केलेला हा जगातील एकमेव असा सुंदर अल्बम आहे, असं मला वाटतंय. इतकं सुंदर संगीत आणि संयोजन करून त्यांनी पूर्ण न्याय दिला आहे. दुसऱ्या आर्टिस्टला पुढे आणावं ही गोष्ट, ही कल्पना फार महत्वाची आहे. त्यांच्यातील ही गोष्ट मनाला भिडली आणि म्हणूनच त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली."

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/