बॉलिवूडमधील कार्तिक आर्यन हा प्रसिद्ध अभिनेता आहे. कार्तिक आर्यन नेहमी कोणत्या न कोणत्या कारणाने चर्चेत असतो. कार्तिक चित्रपटांसोबतच अनेक जाहिरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. कार्तिकने काही दिवसांपूर्वी फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. पण त्याने आता ही जाहिरात करणं बंद केले आहे. जाहिरातीचा करारही पुन्हा रिन्यू केला नाही. जर करार रिन्यू केला असता तर चुक झाली असती, असं कार्तिक आर्यनने सांगितले आहे.
एका युट्यूब चॅनलशी संवाद साधताना कार्तिकने ही माहिती दिली आहे. “काही दिवसांपूर्वी मी फेअरनेस क्रिमची जाहिरात केली होती. मात्र, मी ही जाहिरात करणे बंद केले आहे. मी काहीतरी चुकीचे करत आहे, असं मला वाटले. म्हणूनच मी जाहिरातीचा करारदेखील रिन्यू केला नाही, असं कार्तिकने सांगितले.

या जाहिरातीमुळे कार्तिक आर्यनला प्रचंड ट्रोलिंगला सामोरे जावे लागले होते. फेअरनेस क्रिम लावून लोक गोरे होतात, असं या जाहिरातीच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केला असल्याचे लोकांचे म्हणणे होते. त्यानंतर कंपनीने या क्रिमचे नावदेखील बदलले. यानंतरच कार्तिकने फेअरनेक क्रिमची जाहिरात न करण्याचा निर्णय घेतला.

कार्तिकला पान मसाल्याच्या जाहिरातीसाठी देखील विचारण्यात आले होते. मात्र, त्याने ही जाहिरात करण्यास नकार दिला. याबाबत कार्तिकने सांगितले की, “पान मसाल्याची जाहिरात करण्यासाठी अनेक बँड्सने मला विचारले होते. मात्र, मी नकार दिला. माझा या गोष्टींशी संबंध नाही. मग मी त्या गोष्टींची माहिती प्रेक्षकांना का देऊ. मला ज्या गोष्टी पटत नाही. त्या गोष्टी मी टाळण्याचा प्रयत्न करतो.
कार्तिक आर्यनने खूप कमी वयात बॉलिवूडमध्ये आपलं नावलौकिक कमावले आहे. कार्तिकने अनेक चित्रपटात काम केले आहे. कार्तिक लवकरच चंदू चॅम्पियन या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.