Close

भाईजानच्या ‘सिकंदर’ चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित (Sajid Nadiadwala Shares First Poster Of Salman Khan First Look As Sikandar)

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान ईदच्या दिवशी सिकंदर चित्रपटातून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सलमान खानच्या सिकंदर चित्रपटाची पहिली झलक समोर आली आहे. भाईजानच्या सिकंदर चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं आहे. या पोस्टरमध्ये भाईजानच्या खास ब्रेसलेटची झलकही पाहायला मिळत आहे. सिकंदर चित्रपटाची पहिली झलक पाहिल्यानंतर भाईजानच्या चाहत्यांची उत्कंठा आणखी शिगेला पोहोचली आहे. 

साजिद नाडियाडवलाने सिकंदर चित्रपटाचं पहिलं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये सलमान खानचं आयकॉनिक ब्रेसलेट पाहायला मिळत आहे. सिकंदरच्या पहिल्या पोस्टरमध्ये सलमान खानचं ब्रेसलेट पाहिल्यावर चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या पोस्टरमुळे चाहते अधिकच उत्सुक झाले आहेत. या चित्रपटाच्या पोस्टरसोबत निर्मात्यांनी ॲक्शन सीक्वेन्सच्या शूटिंगची झलकही चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या ॲक्शनची झलक पाहिल्यावर एवढं मात्र नक्की आहे की, २०२५ मध्ये भाईजान जबरदस्त इंटरटेन्मेंट घेऊन चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

सिकंदर चित्रपटाच्या पोस्टरसह निर्मात्यांनी सलमान खानच्या 'सिकंदर'चा लूकही समोर आणला आहे. निर्मात्यांनी चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचा एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये सलमान खान खूपच डॅशिंग दिसत आहे. हेअरस्टाईल, दोन्ही कानात बाली आणि गॉगल असा सलमान खानचा कूल लूक पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये साजिद नाडियाडवाला आणि ए.आर.मुरुगदास आणि सलमान खान एकत्र दिसत आहेत.

नाडियाडवाला ग्रँडसन निर्मित, 'सिकंदर' चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी ए आर मुरुगादास यांच्या खांद्यावर आहे. त्याचबरोबर या चित्रपटात सलमान खान आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. हा ॲक्शन एंटरटेनर ईद २०२५ च्या वीकेंडला रिलीज होणार आहे. सलमान आणि रश्मिका पहिल्यांदाच एकत्र झळकणार असल्याने त्यांना पाहण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

सलमान खान याआधी 'टायगर 3' चित्रपटात झळकला होता. यामध्ये सलमान आणि कतरिना कैफची जोडी पुन्हा एकदा चाहत्यांना पाहायला मिळाली होती. 'टायगर 3' चित्रपटात इमरान हाशमीने खलनायकाची उत्तम भूमिका साकारली होती. मात्र, पहिल्या दोन भागांप्रमाणे हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. त्यानंतर आता सलमान खान सिकंदर चित्रपटाद्वारे चाहत्यांच्या भेटीला येणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/