Close

‘थोडं तुझं थोडं माझं’ मालिकेत सुरू झालीय्‌ लगीनघाई : वडिलांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसीचा निर्णय (Wedding Preparations Gear Up In, ‘Thode Tuze Thode Maze’ Serial With Grandeur)

स्टार प्रवाहच्या थोडं तुझं आणि थोडं माझं या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. मालिकेतल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळत आहे. नात्यांची हळुवार गोष्ट उलगडणाऱ्या या लोकप्रिय मालिकेत मानसीच्या लग्नाची लगबग सुरु झालीय. खरंतर आपल्या मुलीने शिकून स्वावलंबी व्हावं, तिचं चांगल्या घरात लग्न व्हावं हे प्रत्येक आई-वडिलांचं स्वप्न असतं. मानसीच्या बाबांनीही आपल्या मुलींसाठी खूप स्वप्नं पाहिली आहेत.

वीट भट्टीतला कामगार ते वीटभट्टीचा मालक हा संघर्ष मानसीच्या बाबांनी अनुभवला आहे. त्यामुळे आपण जे भोगलं ते आपल्या मुलींच्या वाट्याला येऊ नये असं त्यांना वाटतं. म्हणूनच आपल्यापेक्षाही श्रीमंत असलेलं खानदानी स्थळ त्यांनी मानसीसाठी शोधलं आहे. आपल्या बाबांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी मानसी रणजीतसोबत लग्न करण्यास तयार झालीय.

मानसीने आजवर स्वत:च्या आनंदाचा कधीही विचार केला नाही. इतरांच्या आनंदासाठी आपण मन मारुन जगतोय हेही तिच्या लक्षात येत नाही. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणं हेचं मानसीचं ध्येय आहे. तिने स्वत:साठी कधी स्वप्नं पाहिलंचं नाही. त्यामुळेच प्रेम काय लग्नानंतरही होईल असं तिचं मत आहे. मानसीने लग्न करण्याचा घेतलेला हा निर्णय तिच्या आयुष्याला एक नवी कलाटणी देणार आहे.

Share this article

https://www.perkemi.org/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Situs Slot Resmi https://htp.ac.id/ Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor Slot Gacor https://pertanian.hsu.go.id/vendor/ https://onlineradio.jatengprov.go.id/media/ slot 777 Gacor https://www.opdagverden.dk/ https://perpustakaan.unhasa.ac.id/info/ https://perpustakaan.unhasa.ac.id/vendor/ https://www.unhasa.ac.id/demoslt/ https://mariposa.tw/ https://archvizone.com/